Nawab Malik News : नवाब मलिकांना दुसरा दिलासा ; हमीदार सादर करण्याची मुदत महिनाभराने वाढवली

Mumbai News : गेल्या दीड वर्षांपासून तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांची १४ ऑगस्टला तुरुंगातून जामीनावर सुटका करण्यात आली.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना न्यायालयाकडून आणखी एक दिलासा मिळाला आहे. हमीदार (Guarantor) सादर करण्यासाठी न्यायालयाने त्यांना महिनाभराची मुदतवाढ दिली आहे. गेल्या दीड वर्षांपासून तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांची १४ ऑगस्टला तुरुंगातून जामीनावर सुटका करण्यात आली. ५० हजारांच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने त्यांच्या सुटकेचा आदेश दिला.

हमीदार सादर करण्यासाठी मलिकांना न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली होती. जामीनाच्या आदेशानुसार दिलेलया मुदतीत हमीदार सादर करू न शकल्याने मलिकांनी वाढीव मुदतीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार विशेष पीएमएलए न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मलिक यांची विनंती मान्य केली.

Nawab Malik
India Aghadi News : इंडिया आघाडीचे संयोजकपद काँग्रेसकडे; ‘या’ नेत्याची लागणार वर्णी...

अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी त्यांची भेटही घेतली होती. सना मलिक यांच्या पाठपुराव्यामुळे नवाब मलिकांनाही लवकरच जामीन मिळण्याचा चर्चा होऊ लागल्या. त्यानंतर काही दिवसातच सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिकांना जामीन मंजूर केला. त्यानंतर ते अजित पवार यांच्या गटात जाण्याच्या चर्चा सुरू होत्या.पण सध्या त्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

Nawab Malik
Ravindra Dhangekar Warning : ...म्हणून जिथे चंद्रकांतदादा जाणार, तिथे आंदोलन करणार : धंगेकरांचा थेट इशारा

असे असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील हालचाली अद्यापही सुरूच आहेत. नवाब मलिक हे नुकतेच तुरुंगाबाहेर आल्याने ते कोणत्या गटात जाणार याबाबत अद्यापही चर्चा स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे मलिकांची पुढची राजकीय भूमिका काय असेल? ते काय निर्णय घेतात, याकडे त्यांच्या समर्थकांचेही लक्ष लागले आहे. दुसरीकडे आज पुन्हा सना मलिक यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीसाठी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मलिकांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com