Mumbai News: एकीकडे राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच दुसरीकडे भाजपकडून राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. यात मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अशा विविध पदांचा समावेश होता. राज्य कार्यकारिणीनंतर भाजपकडून आता मुंबई प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या कार्यकारिणीत खासदार उज्जवल निकम यांच्या मुलालाही मानाचं पान मिळालं आहे.
भाजपकडून गेल्या आठवड्यात राज्यातील पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केल्यानंतर आता मुंबई प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी गुरुवारी (ता.5 मार्च) केली. या कार्यकारिणीत ज्येष्ठ सरकारी वकील व भाजप खासदार उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र अनिकेत निकम यांच्या खांद्यावर पक्षाने मुंबई प्रवक्तेपदाची धुरा सोपवली आहे. निकम यांच्यासोबत निरंजन शेट्टी, अजय सिंह, सुमिता सिंह यांनाही प्रवक्तेपदी संधी मिळाली आहे.
महापालिका निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल केले जात आहे. तसेच नव्या दमाच्या तरुणांनी भाजपकडून महत्त्वाच्या जबाबदार्या सोपवल्या जात आहेत. राज्य कार्यकारिणीनंतर मुंबई प्रदेश कार्यकारिणीत याची झलक पाहायला मिळाली. मुंबई प्रदेशच्या नव्या कार्यकारिणीत किरण शेलार, रवी राजा, अभिजित सामंत, पंकज यादव, अमरजित मिश्रा यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राजेश शिरवडकर, पवन त्रिपाठी, श्वेता परुळेकर, विनोद शेलार यांची महामंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे,
याचवेळी भाजपनं मुंबई प्रदेश कार्यकारिणीची कोषाध्यक्षपदी किरीट बन्साळी, युवा मोर्चा अध्यक्षपदाची धुरा दीपक सिंह यांच्याकडे दिली आहे. यातच रंजन शेट्टी, अजय सिंह, सुमिता सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आली आहे. तर उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र अनिकेत निकम यांच्यासह भाजपकडून मुंबई प्रवक्तेपदी अनिकेत निकम, निरंजन शेट्टी, अजय सिंह, सुमिता सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्याच आठवड्यात घोषणा झालेल्या भाजपकडून राज्य कार्यकारिणीतील मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांचा नव्या चेहर्यांना संधी दिल्याचं दिसून आलं होतं. आता खासदार धनंजय महाडिक यांच्या सुपुत्र कृष्णराज महाडिक यांच्याकडे भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली होती. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होती. मात्र, काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता राज्यसभेत राष्ट्रपती कोट्यातून त्यांची खासदारपदी निवड झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.