BJP On National Conference Manifesto : जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास एका दशकानंतर विधानसभा निवडणूक होत आहे. कलम 370 आणि 35A हटवण्यात आल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तसेच स्थानिक पक्षांनीही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. तर आता नॅशनल कॉन्फरन्स कडून या निवडणुकीसाठी जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यावर आता भाजपने जोरदार टीका केली आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकारपरिषदेतून म्हटले आहे की, शनल कॉन्फरन्स नवा काँग्रेसचा(Congress) मित्र, मित्राचा मित्र सख्खा भाऊ म्हणजे उबाठा सेनेचाही सख्खा भाऊ असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने त्यांचा जाहीरनामा जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी घोषित केला आहे. तो जाहीरनामा बघितल्यावर चित्र स्पष्ट दिसत आहे, ही तुकडे तुकडे गँग पुन्हा एकदा वेगळ्याच स्वरूपात निवडणुकीच्या आखाड्यात उतरेल.
याचबरोबर 'या तुकडे-तुकडे गँगचं नवीन स्वरूप, काल-परावापर्यंत शहरी नक्षलवादापुरतं होतं. आता थेट समोर आलेलं आहे. आम्ही या जाहीरनाम्याचा धिक्कार तर करतोच, पण थेट सवाल काँग्रेसला आणि काँग्रेसच्या गोदीत बसलेल्या उद्धव ठाकरे आणि उबाठा सेनेला आहे.'
तसेच 'या जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात नॅशनल कॉन्फरन्स असं म्हणते आहे की, पुन्हा आम्ही काश्मिरचा झेंडा वेगळा करू. राज्याचा ध्वज निर्माण करू, आम्हाला तिरंगा मान्य नाही. तिरंगा ध्वजाखाली जशी सगळी राज्य एकवटली आहेत, तसं जम्मू-काश्मीर नको. ही भूमिका निवडणुकीत मतं घेण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सची आहे. काँग्रेसचं त्याला समर्थन आहे का? आणि विश्वविख्यात पत्रकार पोपटलाल यांचा उद्याचा अग्रलेख त्याच्या समर्थनार्थ आहे का?' असंही शेलार म्हणाले आहेत.
याशिवाय 'आमची भूमिका स्पष्ट आहे, एके देश मै दोन विधान, दोन निशाण, दो प्रधान नही चलेंगे. या सगळ्याच्या विरोधातील लढाईच आमची आहे. नॅशनल कॉन्फरन्सचा जाहीरनामा असं सांगतो आहे की, आम्ही पुन्हा एकदा कलम 370 आणि 35 A लावू. याचा अर्थ त्या भागात पुन्हा एकदा दहशतवाद अशांतता ही कलम 370 काढण्याच्यापूर्वी जी परिस्थिती होती ती आणू, कलम 370 आणि 35 Aला नॅशनल कॉन्फरन्सचा विरोध आहे. काँग्रेसचं याला समर्थन आहे का? उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) तुम्ही हे उचलून धरंल आहे का?' असा सवालही आशिष शेलार यांनी विचारलं आहे.
तर 'पुन्हा एकदा या ‘इंडि’ आघीडीमधील मित्रपक्षांचा खरा चेहरा समोर आला आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही आरक्षण या विषयाचे पुनरावलोकन(रिव्ह्यू) करू. कलम 370 काढल्यानंतर 35A गेल्यांतर, जे देशभरात आरक्षणाचे आमच्या सगळ्या समाजाचे फायदे. जम्मू- श्मीरमधील((Jammu and Kashmir)) लोकांनाही मिळायला लागले आहेत.' असं शेलार म्हणाले.
'आता नॅशनल कॉन्फरन्स हे काँग्रेसचे मित्र आहेत. ते म्हणतात आम्ही आरक्षणाचा रिव्ह्यू करू. मग तुम्ही आरक्षण विरोधी का आहात?, काँग्रेस आरक्षण विरोधी आहे का? उद्धव ठाकरे तुमची भूमिका काय आहे? म्हणून तुकडे-तुकडे गँगचा हा अजेंडा घेवून, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या निवडणुकीत उभे आहेत, परंतु महाराष्ट्रातील जनता विचारत आहे काँग्रेसला आणि विशेषता उबाठा सेनेला यावर तुमची भूमिका स्पष्ट करा.' अशा शब्दांत आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.