Rahul Kul News: भाजप आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का; भीमा पाटस कारखान्याचे साहित्य जप्त करा, साखर आयुक्तांचा आदेश

Bhima Sugar Factory News : शेतकऱ्यांचे ऊसाचे ५ कोटी ७८ लाख रूपये थकीत असल्यामुळे साखर आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
BJP MLA Rahul Kul Latest Marathi News
BJP MLA Rahul Kul Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: भाजपचे आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर साखर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. भीमा सहकारी कारखान्याचे साहित्य जप्त करा, असा आदेश साखर आयुक्तांनी दिला आहे. राहुल कुल यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

भीमा सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे ऊसाचे ५ कोटी ७८ लाख  रूपये थकीत असल्यामुळे साखर आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. शेतकऱ्यांनी याबाबत साखर आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तक्रारीची दखल साखर आयुक्तांनी घेतली आहे.

BJP MLA Rahul Kul Latest Marathi News
BMC Covid Scam : आर्थिक गुन्हे शाखेकडून महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांना समन्स ; आज जबाब नोंदवणार

याबाबत तातडीने खुलासा करावा, आणि शेतकऱ्यांचे पैसे कधी देणार ? याबाबत तातडीने उत्तर द्या, अशी विचारणा कारखान्याला पाठवलेल्या नोटीशीमध्ये करण्यात आली होती. मात्र, याबाबत साखर कारखान्याकडून कुठलीही योग्य कारवाई करण्यात आली नाही. शेतकऱ्यांचे पैसे देखील परत केले नसल्याची माहिती आहे.

BJP MLA Rahul Kul Latest Marathi News
Chandrayaan-3 : दक्षिण आफ्रिकेच्या वर्तमानपत्रात मोदींचे कौतुक ; एस जयशंकर यांचे टि्वट

काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता.

राहुल कुल हे पुण्यातील दौंड तालुक्यातील भाजपचे आमदार आहेत. भीमा सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी, रासप आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत रासपकडून दौंडमध्ये विजय मिळवला होता. २०१९ मध्ये राहुल कुल यांनी रासपला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com