भाजपने केली राऊतांची थेट राहुल गांधीकडे तक्रार

सरकारी यंत्रणांचा गैरवापर आणि भ्रष्टाचारात लिप्त निवडणूक पद्धती राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अपेक्षित आहे का? असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे.
Vikrant Patil
Vikrant Patil Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आपल्या मुलाला युवक काँग्रेस निवडणुकांमध्ये निवडून आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाने केला आहे. यासंदर्भात त्यांनी महावितरण (MSEB) अधिकारी व कंत्राटदारांवर दबाव टाकून व आमिष दाखवून जास्तीत जास्त नोंदणी करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर आणि भ्रष्टाचारात लिप्त अशीच निवडणूक पद्धती राहुल गांधी यांना अपेक्षित आहे का? हे विचारणारे पत्र भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील (Vikrant Patil) यांनी थेट राहुल गांधींना (Rahul Gandhi) पाठविले आहे.

Vikrant Patil
मंत्र्यांच्या दबावात आलेले नाना कार्यकर्त्यांना काय तोंड दाखवणार, बावनकुळेंचा सवाल!

पाटील पत्रात म्हणाले की, पक्षांतर्गत निवडणुकांनमध्ये जर इतके भयंकर प्रकार होत असतील तर, प्रत्यक्ष इतर महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये राऊत काय पातळी गाठू शकतील याची कल्पना केली जाऊ शकते. पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनीही सरकारी यंत्रणाचा गैरवापर स्वतःच्या फायद्यासाठी केला होता आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना पदापासून दूर व्हावे लागले होते. राऊत यांनी केलेला पदाचा गैरवापर आणि आपल्याला अपेक्षित निवडून पद्धतीचे काढलेले धिंडवडे यासाठी पक्षाचे वरिष्ठ या नात्याने आपल्याकडून त्यांचा त्वरित राजीनामा घेतला जावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Vikrant Patil
मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या कुटूंबियांच्या वारसांना नोकरी?

दरम्यान, याआधी पाटील यांनी नवी मुंबईत वाशी येथे महावितरणचे अधिकारी एका बैठकीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तसेच, कंत्राटदारांना या निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी कशी करावी याचे मार्गदर्शन करत असतानाची ध्वनिचित्रफीत पत्रकारपरिषदेत सादर केली होती. या कामात मदत करण्यासाठी 'वरून दबाव' आहे तसेच, या कामात मदत केल्यास कंत्राटदारांना योग्य बक्षीस तर, मदत न केल्यास त्याचेही फळही मिळेल अशा भाषेत महावितरणचे अधिकारी या बैठकीत बोलत असल्याचे या ध्वनिफीतीत दिसून येते, असे त्यांचे म्हणने आहे. या बैठकीच्या ठिकाणी पाटील व काहीकार्यकर्त्यांनी प्रवेश केला व संबंधित अधिकाऱ्यांना जाब ही विचारला होता. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना एका अधिकाऱ्याची महावितरणची डायरी व्यासपीठावर मिळाली. या डायरीत ऊर्जामंत्र्यांच्या मुलाला निवडणुकीत कसे साह्य करायचे याची टिपणे आढळून आली असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच, याबाबत संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

राऊत यांनी आपल्या मुलाच्या निवडणुकीसाठी महावितरणला काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधले असल्याची टीका करत त्यांनी ऊर्जामंत्रीपदाचा तातडीने राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलन करेल असा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला होता. आता नव्याने याप्रकरणी थेट राहुल गांधींकडे पत्र पाठवून त्यांची तक्रार करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com