"नाक घासून मिळवलेल्या सत्तेचा माज दाखवायचा नसतो" : भाजपने राऊतांना एकाच वाक्यात ठणकावले

Shivsena | bjp : भाजपचे संजय राऊत यांना आक्रमक प्रत्यूत्तर
Sanjay Raut, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

(Sanjay Raut latest News | Devenrda Fadnavis news)

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शनिवारी मुंबईत सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी भाजप (BJP) हिंदुत्व, बाबरी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि RSS वर हल्ले चढविले होते. त्यावर काल संध्याकाळी झालेल्या हिंदी भाषी महासंकल्प सभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी सरकारला जोरदार प्रत्यूत्तर दिले.

दरम्यान फडणवीस यांच्या याच भाषणावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे. असे म्हणतं निशाणा साधला होता. राऊत यांच्या या टीकेवर आता भाजपने उत्तर दिले असून हा सत्तेचा अहंकार असल्याचे म्हटले आहे. नाक घासून मिळवलेल्या सत्तेचा माज दाखवायचा नसतो, जनता हा माज क्षणात उतरवेल! असा इशारा देखील दिला आहे. (Sanjay Raut latest News | Devenrda Fadnavis news)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

बाबरी मशिदीच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे आणि शिवसेनेकडून होणारी टीका त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. यावर बोलतांना फडणवीस म्हणाले, मी जेव्हा म्हणालो राम जन्म भूमीमध्ये तुमचा एकही नेता नव्हता, तर किती मिर्ची लागली. किती मिरची लागली, मै तो आयोध्या जा रहा था, मंदिर बना रहा था, तुझको मिरची लगी तो मै क्या करू.

Sanjay Raut, Devendra Fadnavis
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भेदण्यासाठी शिवसनेचे ३ अन् काँग्रेसचे २ मंत्री लागले कामाला

देशाला गरज लागेल तेव्हा कारसेवक बनू..

अरे, हो मी गेलो होतो बाबरी पाडायला आणि मला त्याचा अभिमान आहे. १९९२ साली मी नगरसेवक झालो, त्यानंतर वकील झालो आणि ऍड. देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता. एवढेच नाही १९ व्या वर्षी काश्मीरमध्ये गेलो होता. आम्ही फाईव्ह स्टारचे राजकरण कधी केले नाही, आम्ही झोपलो प्लॅटफॉर्मवर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाहीत. जेव्हा जेव्हा देशाला आवश्यकता असेल तेव्हा आम्ही कारसेवक बनून जाऊ.

आज माझं वजन १०२ आहे त्यावेळी १२८ किलो होते, असा टोला देखील फडणवीसांनी ठाकरेंना लगावला. एकतर्फी प्रेमाची भाषा करणाऱ्यांनी पाच वर्षे आमच्यासोबत संसार केला. पुढे लग्न आमच्याशी केले आणि आमची संपत्ती घेऊन पळून गेले. त्याआधी रितसर घटस्फोटही दिला नाही. पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आले. पण आता हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाचाला खाली आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Sanjay Raut, Devendra Fadnavis
केतकी चितळेही सदावर्तेंच्या वाटेवर : साताऱ्यात बारावा गुन्हा दाखल

फडणवीस म्हणाले, औरंगाबादचा कायम झाला खसरा आणि भाजपचे सरकार येत नाही तोवर संभाजीनगर विसरा. कारण उद्धवजी म्हणाले असतील मॅडम आमचा पाठिंबा काढू नका, आम्ही संभाजीनगर करत नाही, औरंगाबादच ठेवतो, असे म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. पुढे मुंबईला तोडण्याची कोणाच्या बापाची औकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. ठाकरेंचे भाषण काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना समर्पित असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. तसेच बाळासाहेब ठाकरे पवारांना मैद्याचे पोते म्हणायचे, पण त्याच पोत्यासमोर तुम्ही नाक घासून सत्तेत आलात. नुसते वाघाचे फोटो काढले म्हणून वाघ होता येत नाही, असेही फडणवीस म्हणाले.

ती कौरवांची सभा होती आणि आज पांडवांची सभा होत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. औरंजेबाच्या कबरीला भेटी दिल्याने फडणवीस यांनी आमदार अकबरुद्दीन औवेसी यांच्यावर टीका केली. फडणवीस म्हणाले, "काँग्रेस नेते 'आरएसएस' ला ज्या शब्दांत बोलतात. तेच आता उध्दव ठाकरे बोलत असून, इतिहास माहीत नसल्याने खोटे बोलत आहेत. त्यांच्याकडे मुद्दा नसल्याने मुंबईला तोडण्याचा विषय काढतात. तुमच्या अत्याचारपासून आम्हाला मुंबई मोकळी करायची आहे. या राज्याला भूषण वाटेल, अशी मुंबई उभी करायची आहे, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com