शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या राणे अन् महाजनांवर भाजपनं टाकली मोठी जबाबदारी

भाजपचे आमदार नितेश राणे आणि खासदार पूनम महाजनांना शिवसेनेशी पंगा घेणे फायद्याचे ठरले आहे.
Nitesh Rane and Poonam Mahajan
Nitesh Rane and Poonam MahajanSarkarnama

मुंबई : भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि खासदार पूनम महाजनांना (Poonam Mahajan) शिवसेनेशी पंगा घेणे फायद्याचे ठरले आहे. भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मुंबई महापालिकेची (BMC) आगामी निवडणूक शिवसेना आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. आता या लढाईत राणे आणि महाजन महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

महापालिकेतील शिवसेनेचे सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने पक्ष संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. भाजपनं या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक समिती यादी जाहीर केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चेनंतर निवडणुकीच्या दृष्टीने 25 समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या मुंबई शहराध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी जाहीर केल्या आहेत. यात जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी महाजनांची तर निवडणूक संचालन समितीत राणेंची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. राणेंच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. राणे हे सातत्याने शिवसेनेशी पंगा घेत असतात. शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत राणेंच्या पॅनेलने सत्ता मिळवली आहे. नितेश यांचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि बंधू माजी खासदार निलेश राणेही हेसुद्धा शिवसेनेशी कायम पंगा घेत असतात. यामुळे राणेंवर महापालिका निवडणुकीआधी मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

Nitesh Rane and Poonam Mahajan
'पार्टीगेट' प्रकरणात ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या चार सहकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एक जुने व्यंगचित्र ट्विट केले होते. खासदार पूनम महाजन यांनी त्याला प्रत्युत्तर देत नामर्दासारखं ट्विट करू नका, असा इशारा दिला होता. त्यानंतर राऊत यांनी आपल्या ट्विटरवरून ते ट्विट डिलिट केले होते. महाजन यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेवर थेट हल्लाबोल केला होता. शिवसेनेच्या विरोधात बोलायचं नाही, असे मी कधीही कार्यकर्त्यांना सांगितले नाही. मी तर म्हणते एकेकाला ठोका, सोडू नका, असेही त्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या होत्या.

Nitesh Rane and Poonam Mahajan
नितेश राणेंना गोव्याला नेलं पण पोलिसांचं मौनच...

निवडणूक संचालन समितीच्या अध्यक्षपदी आमदार अॅड. आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून माध्यम विभाग समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. निवडणूक संचालन समितीत खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, किरीट सोमय्या हे निमंत्रक असून आमदार राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर, नितेश राणे, प्रकाश मेहता हे सदस्य असतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com