'पार्टीगेट' प्रकरणात ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या चार सहकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या निवासस्थानी झालेल्या पार्ट्यांवरून राजकारण तापले आहे.
Boris Johnson
Boris JohnsonSarkarnama
Published on
Updated on

लंडन : लॉकडाऊनमध्ये ब्रिटनचे (UK) पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या निवासस्थानी झालेल्या पार्ट्यांवरून राजकारण तापले आहे. या 'पार्टीगेट' प्रकरणात जॉन्सन यांनी पायउतार व्हावे, यासाठी दबाव वाढत असताना त्यांच्या चार निकटवर्तीय सहकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यामुळे जॉन्सन यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानले जात आहे.

कोरोना (Corona) विषाणूच्या संसर्गामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला होता. त्यावेळी लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर बंधने असतानाच ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मित्रांना बोलावून दारू पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आता जॉन्सन यांचे धोरणप्रमुख मुनिरा मिर्जा, चीफ ऑफ स्टाफ डॅन रोसेनफिल्ड, प्रधान स्वीय सहाय्यक मार्टिन रेनॉल्ड्स, माध्यम संचालक जॅक डॉयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

जॉन्सन यांनी आता प्रशासनात सुधारणा करण्याचे पाऊल उचलले आहे. यातूनच या सहकाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात जॉन्सन यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात पार्ट्या झाल्याचे तपासातून समोर आले आहे. यामुळेच हे राजीनामासत्र सुरू असल्याचे बोलले जात आहे. जॉन्सन यांच्या नेतृत्वावर त्यांच्या पक्षातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

Boris Johnson
राऊतांना 'नॉटी नामर्द' म्हणण्यामागील कारण अमृता फडणवीसांनीच अखेर केलं उघड

दरम्यान, पंतप्रधान जॉन्सन यांच्या खासगी सचिवाने पाठवलेला ई-मेल आता समोर आला होता. जॉन्सन यांच्या सुमारे 100 मित्र आणि सहकाऱ्यांना ई-मेल पाठवण्यात आला होता. या ई-मेलमध्ये तुमची दारू तुम्हीच आणा, असे म्हटले होते. ही पार्टी पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान असलेल्या डाऊनिंग स्ट्रीटवरील गार्डनमध्ये झाली होती. विशेष म्हणजे देशात लॉकडाऊन असताना ही पार्टी झाली होती. ही पार्टी 2020 च्या नाताळमध्ये झाली होती. त्यावेळी देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते.

Boris Johnson
मोठी बातमी : नितेश राणेंना न्यायालयाचा दिलासा

यामुळे डाऊनिंग स्ट्रीटवर सातत्याने होणाऱ्या पार्ट्या चर्चेत आल्या आहेत. या प्रकरणी जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करीत होते. याबाबत अखेर जॉन्सन यांनी देशाची माफी मागितली होती जॉन्सन यांनी संसदेत माफीनामा सादर करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी म्हटले होते की, मला सगळ्यांची माफी मागायची आहे. काही गोष्ट चुकीच्या पद्धतीने झाल्या. मी याची जबाबदारी घेतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com