मुंबई : 'मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांवरील ED ची कारवाई भाजपा राजकारणातील अंडरवर्ल्ड डॉन झाला आहे हे पुन्हा दर्शवते. पूर्वी डॉन जागा बळकावण्यासाठी गुंड पाठवायचे. मोदी सरकार (Modi Government) सत्ता बळकावण्यासाठी तपास यंत्रणा पाठवते, असे म्हणत कॉंग्रेस नेते सचिन सावंत (sachin sawant) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
२०१४ ते २२ मध्ये ED ने २९७४ धाडी उगीच टाकल्या नाहीत. यात एकही भाजपाचा नाही. खरे तर भाजप अध्यक्षांची आधी चौकशी झाली पाहिजे. वाधवानकडून ₹२० कोटी देणगी कशी मिळाली? हा काळा पैसा नाही? आधुनिक दुर्योधन व दुःशासन लोकशाहीचे वस्त्रहरण करताना संविधानिक संस्था भीष्माचार्य व द्रोणाचार्याप्रमाणे साथ देत आहेत. धृतराष्ट्राप्रमाणे कायदेव्यवस्था वागते हे देशाचे दुर्दैव, अशी जळजळीत टीकाही सचिन सावंत यांनी केली आहे.
दरम्यान, मंगळवारी (२२ मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे (Rashmi Thackeray) बंधू श्रीधर पाटणकर यांच्या ताब्यातील सदनिका अंमलबजावणी संचालनालायने (ED) ताब्यात घेतल्यानंतर त्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. त्यातून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा सामना आणखी कठोर होणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरेंचे मेहुणे श्रीधर माधव पाटणकर (Sridhar Patankar) यांची 6.45 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत 11 सदनिकांचा समावेश आहे.
ईडीने करचुकवेगिरी प्रकरणी पुष्पक बुलियन आणि समूहातील इतर कंपन्यांच्या विरोधात 6 मार्च 2017 रोजी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ईडीने आधी महेश पाटील, चंद्रकांत पटेल आणि त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या मालकीच्या कंपन्यांची 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. पुष्पक ग्रुपमधील पैसे महेश पटेल यांनी पुष्पक रिअॅलिटीचे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या सहाय्याने इतर कंपन्यांत वळवल्याचे ईडीच्या तपासात समोर आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.