Ajit Pawar News : मोदी अन् पवारसाहेबांबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांचा मोठा खुलासा; म्हणाले, 'हेच माझं दुर्दैव...!'

Ajit Pawar - Narendra Modi - Sharad Pawar : पुणे शहरात मोदी यांच्या सभेवेळी शरद पवार यांच्यावर मोदींनी बोलू नये अशी विनंती मी स्वतः केली होती. मात्र, नेमकं त्याचवेळी भटकती आत्मा म्हणुन शरद पवारांचा उल्लेख केल्यामुळे फटका बसल्याची कबुली दिली असल्याच्या चर्चांवर अजित पवारांनी मोठा खुलासा केला आहे.
ajit pawar sharad pawar narendra modi
ajit pawar sharad pawar narendra modi sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा'असा केला होता.यावरुन महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं होतं.एवढंच नाही तर या मोदींचं वक्तव्य महायुतीवर बुमरँग झालं होतं.

लोकसभेला या मोदींच्या वक्तव्याचा जोरदार फटकाही बसला.आता खुद्द उपमुख्यमंत्री आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी देखील मोदींच्या या वक्त्व्याचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला असल्याची कबुली येवल्यातील पक्षाच्या बैठकीत दिली असल्याची बोलले जात होते.मात्र, अजितदादांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit PAwar) यांनी जन सन्मान यात्रेदरम्यान शनिवारी सिन्नर (ता.10)येथे माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले.पुणे शहरात मोदी यांच्या सभेवेळी शरद पवार यांच्यावर मोदींनी बोलू नये अशी विनंती मी स्वतः केली होती. मात्र, नेमकं त्याचवेळी भटकती आत्मा म्हणुन शरद पवारांचा उल्लेख केल्यामुळे फटका बसल्याची कबुली अजित पवारांनी येवला येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यावर आता अजित पवारांनी आपण असं बोललोच नसल्याचा खुलासा केला आहे.हेच दुर्दैव आहे ना.मागेही काहीतरी माझ्या नावाखाली खपवण्यात आलं. अजित पवार बहुरुपी होऊन मास्क लावून जात होते.मी म्हटलं दाखवा ना,सीसीटीव्ही असतात. कुणी काही बाहेर येऊन म्हटलं, दादांनी असं वक्तव्य केलं.

ajit pawar sharad pawar narendra modi
Ajit Pawar : "भुजबळ प्रचाराला जातील त्या मतदारसंघातील नेता पाडा", जरांगे-पाटलांचं विधान अन् अजितदादा म्हणाले...

पण आपणही हे असं वक्तव्य, चर्चा काही खरंच झाली आहे का याची शहानिशा केली पाहिजे.मात्र, मी असं काही बोललोच नाही, आणि जर बोललो असेल तर पुरावा द्या.म्हणजेच हाच सूर्य हा जयद्रथ अशा शब्दांत अजितदादांनी शरद पवारांबाबत नरेंद्र मोदींशी केलेल्या वक्तव्य फेटाळून लावले आहे.

लोकसभा निवडणुकीत संविधान, घटना बदलली जाईल,आरक्षण काढलं जाईल असे काही फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्यात विरोधक यशस्वी ठरले. आणि आमच्यापासून अल्पसंख्याक समाज दूर गेला, याचा फायदा महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसल्याचा पुनरुच्चार अजित पवारांनी यावेळी केला.

अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला.पण झालं गेलं गंगेला मिळालं.आता आम्ही नव्या उमेदीनं जनतेसमोर जात आहोत. मी स्वत: असं ठामपणे ठरवलं आहे की, इतरजण बाकीच्या गोष्टींवर बोलत असताना आपण फक्त विकासावर बोलायचं.इतर महायुतीसंदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील, त्या आम्ही नेते एकत्र ज्यावेळी बसतो त्यावेळी बोलू असंही ते म्हणाले.

ajit pawar sharad pawar narendra modi
Bacchu Kadu : मोठी बातमी! बच्चू कडू शरद पवारसाहेबांच्या भेटीला, महाविकास आघाडीसोबत जाणार?

यापूर्वी चूक झाली तर साहेब...

लोकसभेनंतर विधानसभेसाठी अजित पवारांनी स्वतःसह आपल्या पक्षाच्या प्रचारातही काही मोठे बदल केले आहेत. यावर विचारले असता अजित पवार म्हणाले, पूर्वी मी ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. वडीलधाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करताना माझ्यावर मोठी जबाबदारी नव्हती. आता मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने आपोआपच जबाबदारी वाढलेली आहे.

एका पक्षाचा अध्यक्ष असल्याने आता माझ्या प्रत्येक गोष्टीवर लोकांचे बारकाईने लक्ष आहे. यापूर्वी माझ्याकडून एखादी चूक झाली तरी साहेब एखादे विधान करून सावरून घेत होते. आता मात्र मलाच तोलून-मापून बोलावे लागत आहे, अशी कबुलीही अजितदादांनी Ajit PAwar दिली.

मोदी नेमकं काय म्हणाले होते...?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पुण्यात झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा केला होता. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही,ज्यांची स्वप्ने अपूर्ण राहतात, त्यांचे आत्मे फिरत राहतात. स्वत:चं काम नाही झालं तर त्यांना इतरांचे काम बिघडवण्यात त्यांना आनंद मिळतो. महाराष्ट्रही अशा अतृप्त आत्म्याचा शिकार झाला आहे.इथल्या एका मोठ्या नेत्याने 45 वर्षांपूर्वी आपल्या महत्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एका अस्थिरतेच्या काळात गेला असल्याची टीका त्यांनी केली होती.

ajit pawar sharad pawar narendra modi
Congress Politics : हरियाणा निवडणुकीत काँग्रेस 'विनेश'ला मैदानात उतरवणार, सहानुभुतीच्या आडून राजकीय डाव साधणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com