Tipu Sultan नामकरणावरून फडणवीस म्हणाले, सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस...

काँग्रेसकडून (Congress) देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
Devendra Fadnavis Criticizes Mahavikas Aghadi Government
Devendra Fadnavis Criticizes Mahavikas Aghadi GovernmentSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबई मलाडमधील क्रिडा संकुलाच्या नावावरून सत्ताधारी आणि विरोधकामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. भाजपने (Bjp) टिपू सुलतान (Tipu Sultan) नावाला जोरदार विरोध करत आज (ता.26 जानेवारी) आक्रमक आंदोलन केल आहे. यामध्ये अनेक भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांना व त्यांच्या बरोबरीने या आंदोलनात सामील झालेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(Devendra Fadnavis Criticizes Mahavikas Aghadi Government)

हा वाद वाढतच चालला आहे. आज (ता.26 जानेवारी) सकाळी फडणवीसांनी या नावाला विरोध केला त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून त्यांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार निशाणा साधत सत्तेसाठी हे लाचार झालेत, अशी टीका त्यांनी केली आहे. त्यांच्या या टिकेला काँग्रेसकडून (Congress) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून. सचिन सावंतानी (Sachin Sawant) राष्ट्रपतींचा एक व्हिडिओ ट्विट करत भाजपला आरसा दाखवण्याचे काम केले आहे.

Devendra Fadnavis Criticizes Mahavikas Aghadi Government
संकुलाला टिपू सुलतान हे नाव पूर्वीपासूनच; भाजप धर्मांधतेचे वातावरण तयार करत आहे!

कारवाईनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हणाले, सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस मालाड येथील क्रीडासंकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा कार्यक्रम पोलिस संरक्षणात आणि हिंदूंवर अनन्वित करणार्‍या टिपू सुलतानचे नाव न देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या भाजपा, विहिंप, बजरंग दल कार्यकर्त्यांवर लाठीमार-अटक! याचा तीव्र निषेध, अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Devendra Fadnavis Criticizes Mahavikas Aghadi Government
video : टिपू सुलतान प्रकरणावर आदित्य ठाकरे काय म्हणाले पाहा?

आज दिवसभरापासून मालाडमध्ये या आंदोलनामुळे हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. क्रिडा संकुलाच्या उद्घटनानंतर अस्लम शेख यांनीही भाजपवर जोरदार टीका केली तर, भाजच्या टीकेला उत्तर म्हणून कॅाग्रेस नेते सावंतांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतान यांच्यासाठी काढलेल्या गौरवार्थ उल्लेखाची आठवण करून दिली आहे.

सावंत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, भाजपच्या नेत्यांच्या प्रबोधनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहीद टिपू सुलतान यांचा केलेला गौरवार्थ उल्लेख. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नाही जरी केला तरी राष्ट्रपतींचा तरी भाजपा नेते आदर करतील अशी अपेक्षा आहे, अश्या शब्दात त्यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com