बंडखोरांना नेणाऱ्या बसच्या दारात स्वतः संजय कुटे उभे राहिले...

बंडखोरांना सहकार्य करण्यात भाजपने बुलडाणा जिल्ह्यातील आमदार संजय कुटे ( Sanjay Kute ) यांची नियुक्ती केली होती.
Sanjay Kute
Sanjay KuteSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेतील बंडामागे आम्ही नसल्याचे सांगत भाजपने नंतर त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. एवढेच हे बंड घडवून आणण्यात आणि बंडखोरांना सहकार्य करण्यात भाजपने बुलडाणा जिल्ह्यातील आमदार संजय कुटे ( Sanjay Kute ) यांची नियुक्ती केली होती. या बंडखोरांची पहिल्या टप्प्यातील म्हणजे सुरत येथील सारी व्यवस्था कुटे यांनी पाहण्याचे नियोजन होते. त्यांनी ते यशस्वी करूनही दाखवले. पण आपल्या या यशाचे श्रेय घेण्यास कुटे अजूनही तयार नाहीत. आपण बंडखोरांच्या सुरतमधील लि मेरीडियन हॉटेलमध्ये योगायोगाने गेला होतो, असे ते बिनदिक्कत सांगतात. अर्थात त्यांचा हा `योगायोग` म्हणजे शुद्ध थापच असल्याचे आज विधानभवनाच्या आवारात सिद्ध झाले.

विधीमंडळाच्या अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या स्वागत आणि त्यांचे भाषण संपल्यानंतर कामकाज थांबले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सारेच आमदार सभागृहात बाहेर आले.

Sanjay Kute
निलंबित बारा आमदारांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल : संजय कुटे

शिंदे सरकारची उद्या (ता. 4) बहुमत चाचणी असल्याने या बंडखोर आमदारांना पुन्हा नजरकैदेत ठेवले जाणार आहे. विशेष अधिवेशनातील पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर बंडखोर आमदारांना पुन्हा ताज प्रेसिडेंटमध्ये नेण्यात आले. त्यानुसार दुपारी पावणेतीन वाजता बंडखोर आमदारांना नेण्यासाठी विधान भवनाच्या दारात बस आली. त्यासाठी साऱ्या बंडखोरांवर नजर ठेवून असलेल्या कुटे यांनी त्यांना गोळा केले. कोणत्या बसमध्ये कोणता आमदार बसणार आहे, याची माहिती त्यांच्याकडेच होती. त्यानुसार या आमदारांनी उपस्थित गर्दीतील कोणाशीही न बोलता बसमध्ये चढावे, यासाठी त्यांचा आटापिटा सुरू होता.

Sanjay Kute
संजय कुटेंची गुगली... म्हणे मी सुरतला योगायोगाने गेलो होतो...

अधिवेशनानिमित्त आणि बंडखोरीनंतर अनेकजण भेटत असल्याने या गटातील काही आमदार इतरांशी बोलत होते. मात्र, ते गर्दीत राहू नयेत, कोणाशी काही बोलणार नाहीत ना, याकडे जातीने लक्ष देत शेवटी कुटे यांनी प्रत्येक बंडखोर बसमध्ये बसला आहे की नाही, याची खात्री केली. कोणी आमदार माध्यमांच्या प्रतिनिधीपुढे नको ते बोलणार नाही, याची काळजी कुटे प्रकर्षाने घेत होते. त्यासाठी ते आमदारांच्या मागे धावत होते. विधानभवनात कोणी थांबले नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी कुटेच पुन्हा पुन्हा बसमधून उतरून ये-जा करत होते. या आमदारांत सगळ्यात शेवटी मुख्यमंत्री शिंदे आले. ते बसमध्ये बसले आणि `प्रेसिडेंट`च्या दिशेने निघाली. यावेळी संजय कुटे बसच्या दारातच उभे असल्याचे दिसून आले.

शिंदे सरकारवरील बहुमत सिद्ध होईपर्यंत पुढील काही तास कुटे यांची अशीच धावपळ होणार आहे. पण ही धावपळ `योगायोगा`ने करत होतो, असे कुटे यांना म्हणता येणार नाही कारण त्यांच्या या धावपळीनंतर त्यांना स्वतःला सत्तेचा योग येणार आहे, अशीही चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com