राजकारण तापलं; सोमय्यांच्या नावाने बनावट एफआयआर

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या नावाने पोलिसांनी बनावट एफआयआर केल्याचा आरोप केला आहे.
Kirit Somaiya News
Kirit Somaiya NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपल्या नावाने पोलिसांनी बनावट एफआयआर (FIR) केल्याचा आरोप केला आहे. त्याविरोधात सोमय्या आता आक्रमक झाले असून दुपारी खार पोलीस ठाण्यात जाणार आहेत. सोमय्या यांनी थेट मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे यावरून आता आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या पोलिसांनी बनावट एफआयआर लिहिली. पोलिसांनीच नकली सही केली. त्यावर नकली कारवाईही सुरू केली आहे. माझी एफआयआर पोलिसांनी घेतलेली नाही. तीन तास मी बांद्रा पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलो होतो. संजय पांडे हे एवढी माफियागिरी सहन करणार. म्हणून मी आज खार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करणार आहे.

Kirit Somaiya News
सोमय्यांवरील हल्ल्याची गंभीर दखल; यापुढे दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश?

माझ्या नावाने जी एफआयआर करून कारवाई सुरू केली आहे, हा फौजदारी गुन्हा आहे. ज्यांनी ती एफआयआर केली आहे, त्याच्यावर ताबडतोब फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांच्या भेटीवर बोलताना सोमय्या म्हणाले, मला तीनवेळा जीवे मारण्याचा प्रयत्न पोलिसांच्या उपस्थितीत झाला. कंमांडो विभागाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. सरकारला ताकीद दिली आहे. तुम्ही योग्य कारवाई केली नाही, तर कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला आहे. ठाकरे सरकार हादरल्याने हल्ले होत आहेत.

शुट अॅट साईटचे आदेश?

किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी (२३ एप्रिल) दुसऱ्यांदा हल्ला झाला. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अटक झाल्यानंतर त्यांना भेटायला गेले असता खास पोलिस स्टेशनजवळ किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटली असून त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली आहे. दरम्यान हल्ल्यानंतर बोलताना हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.

Kirit Somaiya News
एलॉन मस्क बनले ट्विटरचे मालक अन् पराग अग्रवालांची चिंता वाढली!

सोमय्या यांच्यावर यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या आवारात देखील हल्ला झाला होता. फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणासाठी सोमय्या पुणे महापालिकेत गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर पहिल्यांदा हल्ला झाला होता. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. हा हल्ला देखील शिवसैनिकांनीच केल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. दरम्यान दोन वेळा झालेल्या या हल्ल्यांनंतर CISF वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे.

सीआयएसएफच्या कमांडो विभागाने हल्ल्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे. तसेच सीआयएसएफच्या कमांडर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेनंतर आता किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास हल्लेखोरांविरोधात shoot at साईट अर्थात जागेवर गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com