यशवंत जाधव हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 'फंड कलेक्टर'

Kirit Somaiya : राकेश वाधवानचा व माझा काडीचाही संबंध नाही. जितेंद्र नवलानींना ओळखत असल्याचे मला आठवत नाही, असा खुलासा सोमय्यांनी केला आहे.
Kirit Somaiya News | Kirit Somaiya Latest News
Kirit Somaiya News | Kirit Somaiya Latest News sarkarnama
Published on
Updated on

राजगुरूनगर : यशवंत जाधव (Yashwant Jadhav) हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) 'फंड कलेक्टर' आहे, तर बजरंग खरमाटे (Bajrang Kharmate) हा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा 'सचिन वाझे' आहे, असा आरोप भाजपचे (BJP) नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी येथे केला आहे. एजंटकडे एवढे घबाड मिळाले, तर मुख्य कलेक्टरकडे किती पैसे असतील, असाही सवाल त्यांनी केला. राकेश वाधवानचा व माझा काडीचाही संबंध नाही. संजय राऊतांच्या आरोपांना काडीचीही किंमत नाही, कारण पुराव्याचा एकही कागद ते देऊ शकले नाहीत.असेही त्यांनी स्पष्ट केले. ते राजगुरूनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व भाजप (BJP) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

Kirit Somaiya News | Kirit Somaiya Latest News
मी आतापर्यंत कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा मागितला नाही... पण..

सोमय्या म्हणाले, मी कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही. संजय राऊतांकडे मात्र एकही पुराव्याचा कागद नाही. असेल तर गेले अनेक महिने ते गप्प का बसले आहेत? त्यांचा भागीदार सुजित पाटकर याला पात्रता नसताना कोविड सेंटरचे काम दिले गेले. कोविड घोटाळा बाहेर काढला, म्हणून राऊत काहीही बोलत आहेत. माझ्याविरुद्ध व माझ्या कुटुंबियांविरुद्ध केलेले आरोप खोटे असून त्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या अहवालात माझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे म्हटले आहे. राकेश वाधवानचा व माझा काडीचाही संबंध नाही. जितेंद्र नवलानींना ओळखत असल्याचे मला आठवत नाही, असा खुलासा सोमय्या यांनी केला. (Kirit Somaiya Latest News)

नवाब मलिक कोठडीतून लवकर बाहेर येतील असे वाटत नाही. त्यांच्या चौकशीची व्याप्ती दुबई, कराची इथपर्यंतही असू शकते. ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जात असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे म्हणणे चुकीचे आहे. पवारांचे आणि दाऊदचे संबंध आहेत, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तुम्ही मुस्लिम आहात का? तुमचा आदर आहे, पण देशद्रोह्याला पाठिशी घालू लागले तर चालणार नाही, असे ते म्हणाले.

Kirit Somaiya News | Kirit Somaiya Latest News
अजित पवार सपोर्ट करत नाहीत.. बडे साब सब देख रहे है! : फडणविसांच्या आरोपांनी खळबळ

गेल्या दोन वर्षांपासून माफियाराज चालविले जात आहे. महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त आणि माफियामुक्त करण्यासाठी मी अनेक प्रकरणे घेऊन ईडी, सीबीआय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय इत्यादी ठिकाणी जात असतो. महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी हे सर्व करतो. त्यामुळे मला ईडीचा एजंट म्हटल्याने मला काही वाटत नाही. मी खरेतर महाराष्ट्राच्या जनतेचा एजंट आहे, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले. (Latest Political News in Marathi)

किशोरी पेडणेकरांनी एसआरए योजनेत गाळे ढापले, याची खात्री झाली आहे. त्यासाठी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर लवकर सुनावणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यशवंत जाधवांनी बेनामी कंपन्या काढून फसवणूक केली. त्याच्या चौकशीच्या मागे लागणार आहे, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com