मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मंत्रालयाला दिले आहेत. मात्र, मुख्यमंत्रीसाहेब मी वाट पाहतो की मंत्रालयात माहिती अधिकाराच्या अवलोकनासाठी गेलेल्या किरीट सोमय्यावर (Kirit Somaiya) तुम्ही गुन्हा कधी दाखल करता ते. तुम्ही दिलेले आदेश मंत्रालय पाळत नाही. माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान आहे की तुमच्यात हिम्मत असेल तर एफआयआर दाखल करा, असे भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या म्हणाले.
सोमय्या यांना दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने नोटीस पाठवली होती. या प्रकरणावर त्यांनी आज (ता. २७) पत्रकार परिषद घेत भाष्य केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. सोमय्या म्हणाले, फक्त एका फोटोसाठी मुख्यमंत्री माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगत आहेत. दोष काय तर मी खुर्चीवर बसलो. दोन कर्मचारी माझ्या सेवेत आहेत. ठाकरे जे खोटे बोलले ती चोरी मी पकडली, त्याचा राग त्या कर्मचाऱ्यांवर ते काढत आहेत. एका गरीब टायपिस्ट लिपीकाला तुम्ही नोटीस देता. बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे मुख्यमंत्री बघा, असे सोमय्या म्हणाले.
भ्रष्टाचार तुम्ही करता, लढाई करायची आहे तर माझ्याशी करा, माझ्यावर कारवाई करा, गरीब लिपीकाला नोटीस पाठवताना मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, असा घणाघात सोमय्या यांनी केला. ज्या फोटोसाठी मला २ दिवसात कारणे द्या नोटीस पाठवली, तो फोटो माझा आहे. त्यामध्ये एका अधिकारी आणि एक लिपीक दिसतो. फोटो अंतरावरून काढला. तो काही सेल्फी नाही. ज्यांनी फोटो काढला तो अपलोड केला, त्याला नोटीस देण्याऐवजी जे व्हिक्टीम आहेत,'' त्यांना ठाकरे सरकार नोटीस देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांना तो फोटो कोणी काढला, ते माहीत आहे. त्या टायपिस्टसोबत बदला घेण्याचे पाप मुख्यमंत्र्यांनी केले. हा फोटो कोणी काढला ते तपासून पाहा. तुमच्याकडे मंत्रालय सुरक्षा विभाग आहे, असेही सोमय्या म्हणाले. तसेच मला कोणत्या कायद्याच्या आधारे नोटीस पाठवली आहे. कायद्याचे सेक्शन दाखवा. उद्धव ठाकरेंचा कायदा आहे, त्यांची ठोकशाही, माफिया सेनेची दादागिरी आणि गुंडागिरी आहे, असे आरोप सोमय्या यांनी केले.
मी १७ जानेवारीला माहिती अधिकाराचा अर्ज केला होता. प्रश्न काय तर खुर्चीवर का बसवले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मी कागदपत्रांची पडताळणी करून आलो. ग्रामविकास मंत्रालय आणि विभागात देखली कागदपत्रांची पडताळणी करून आलो, या सर्व ठिकाणी मला खुर्ची देण्यात आली होती, त्या सर्वांना तुम्ही नोटीस पाठवणार का असेही सोमय्या म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.