लवकरच सलीम आणि जावेदची भेट होणार; कंबोज यांचा राऊतांना टोला

Shivsena|Sanjay Raut|ED|Mohit Kamboj:शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर आज ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली.
Sanjay Raut, Mohit Kamboj
Sanjay Raut, Mohit Kambojsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मालमत्तेवर आज ईडीकडून (ED) जप्तीची कारवाई करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तूळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून भाजप हे सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला तर, भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राऊतांवर करण्यात आलेल्या या कारवाईचे स्वागत करत लवकरच राऊत हे जेलमध्ये जातील असा दावा केला आहे.

Sanjay Raut, Mohit Kamboj
पार दिल्लीत जातंय! हिंदीत बोलण्याची जयंत पाटलांना धास्ती

ईडीने राऊतांच्या मालमत्तेवर केलेल्या कारवाईवर कंबोज म्हणाले, ईडीने राऊतांवर जी कारवाई केली त्याचे स्वागत आहे. कष्टानं, घामाच्या पैशाने ही संपत्ती जमवली असे राऊत म्हणतात मात्र, कुठलेही उत्पन्न नसताना आणि ६५० हून अधिक पत्राचाळीतील लोकांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली नाही. मात्र संजय राऊतांना कोट्यवधीचा फ्लॅट मिळाला आहे. हा पैसा कुठून आला? हे पैसे प्रविण राऊतांनी जो भ्रष्टाचार केला तो कुणाच्या जीवावर केला? असा सवाल कंबोज यांनी राऊतांवर निशाणा साधला.

Sanjay Raut, Mohit Kamboj
Nilesh Rane : संजय राऊत मोठा डल्ला मारायला गेले, अन् अडकले..

लोकांची घरे हिसकावून स्वता:चा आशियाना बनवण्याचे काम हे प्रविण राऊतांनी संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केले आहे. विरार, नालासोपारा, वसई, गोरेगावसह अन्य प्रकल्पग्रस्तांना अद्याप घरे मिळाली नाहीत. मात्र कोट्यवधीची घरे राऊतांना मिळाली. आज ईडीने केलेल्या कारवाईच आम्ही स्वागत करतो. आम्ही आधीपासून सांगतोय सलीम आतमध्ये गेले आहेत आता जावेदही लवकरच जाणार आहे. गोष्ट आधी आणि नंतरची आहे. सलीम-जावेदची भेट लवकरच होईल, असा इशारा देत कंबोज यांनी नवाब मलिक आणी राऊतांवर हल्लाबोल केला.

दरम्यान, ईडीने केलेल्या कारवाईवर राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कष्टाने कमवलेली संपत्ती ईडीने जप्त केली आहे. १ रुपयाही अवैध मार्गाने जमा झाला असेल तर सगळी संपत्ती भाजप पक्षाला दान करू ५५ लाखांचे कर्ज होते हे प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. ईडीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी आम्ही खंबीर आहे. जप्त केलेल्या फ्लॅटमध्ये माझे कुटुंब राहते. तसेच संपत्तीची व्याख्या आता बदलावी लागेल. तुमच्या बापाला घाबरत नाही, अश्या शब्दात राऊतांनी भाजपवर पलटवार केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com