पार दिल्लीत जातंय! हिंदीत बोलण्याची जयंत पाटलांना धास्ती

अंमलबजावणी संचलनालयाने (ED) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता जप्त आहे.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अंमलबजावणी संचलनालयाने (ED) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता जप्त आहे. यात दादरमधील फ्लॅट आणि अलिबागमधील ८ भुखंड जप्त करण्यात आले आहेत. एक हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

जयंत पाटील म्हणाले, ईडीने कोणतीही पूर्वकल्पना न देता राऊत यांच्यावर कारवाई केली. ईडीला राऊत यांच्या मालमत्तेवर टाच आणायचीच होती तर आधी त्यांना माहिती द्यायला पाहिजे होती. त्यामुळे ही कारवाई म्हणजे संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न दिसतो, असे पाटील म्हणाले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जयंत पाटील यांना हिंदीत प्रतिक्रिया देण्याचा आग्रह केला. त्यावर पाटील म्हणाले, नको हिंदीत बोलले की पार दिल्लीला जाते, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. त्यामुळे पाटील यांच्या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Jayant Patil
ईडीने संजय राऊतांवर कारवाई का केली; राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले कारण

त्याच बरोबर त्यांनी यावेळी भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावरही निशाणा साधला. सोमय्या बोलतात त्यानंतर दोन ते चार दिवसांत घटना घडतात. केंद्रीय तपास यंत्रणा सोमय्या यांना माहिती देत असाव्यात. सोमय्या यांना तपास यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईची अगोदरपासूनच कल्पना असते. त्यामुळे राज्यात सोमय्या यांची ओळख अचूक भाकीत वर्तविणारा गृहस्थ अशी झाली आहे, असा टोला पाटील यांनी लगावला.

Jayant Patil
भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांना तीन महिने कारावासाची शिक्षा...

सोमय्या यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना काय पुरावे दिलेत हे मला माहिती नाही. मात्र, देशाच्या सरन्यायाधीशांनीही ईडीच्या कारवाईविषयी आपले मत व्यक्त केले आहे. याचा अर्थ ईडीचा दुरुपयोग होत आहे. ईडीच्या कारवायांमुळे महाविकास आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होण्याचा प्रश्न नाही. अशा कारवायांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारशी संबंधित लोकांना बदनाम करण्याचा आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com