Ashok Chavan On Congress : 'तुम्ही रातोरात पक्ष बदलता; पण तुमच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं?' चव्हाण म्हणाले...

Ashok Chavan On Congress Party : "तुमच्या मतदारसंघात जी काही राजकीय केमिस्ट्री आहे.."
Ashok Chavan Latest Statement :
Ashok Chavan Latest Statement : Sarkarnama

Mumbai News : राज्याचे माजी मुख्यमंत्री व एकेकाळी काँग्रेसचे मातब्बर नेते राहिलेले अशोक चव्हाण यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. भाजपत प्रवेश करताच त्यांची लगोलग राज्यसभेवर वर्णी लागली. चव्हाणांना भाजपत ओढून आणण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. भाजप प्रवेशानंतर आता त्यांना काँग्रेसबाबत प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. (Latest Marathi News)

अशोक चव्हाण यांनी नुकतीच एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, "तुम्ही सहज पक्षांतर केलंत, पण तुमच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? म्हणजे इतकी वर्षे कार्यकर्त्यांनी रक्त आटवायचं. पक्ष उभा करायचा? आता ज्यांच्या विरोधात त्यांना लढायचं होतं, त्यांच्याचसोबत जाऊन तुम्ही गळ्यात गळे घालता? त्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जमणार आहे का सगळं? (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण म्हणाले, "माझ्या मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये अशी थोडीशी परिस्थिती आहे. मी नाकारत नाही. पण मी त्यांना सांगितलं तुम्हाला काँग्रेसमध्ये (Congress) राहायचं असेल तर तिथेच राहा. आमदारांनाही तेच सांगितलं आणि माझ्याबरोबर राहिलेल्या माझ्या सहकाऱ्यांना तेच सांगितलं. मी आजपर्यंत अनेकांना नगरसेवक केलं. अनेकांना आमदार केलं. या सर्वांनी माझ्यासोबत यावंच असं नाही. तुमच्या मतदारसंघात जी काही राजकीय केमिस्ट्री आहे, ते लक्षात ठेवून, जिथे राहायचं आहे तिथे राहा, असं मी म्हटलं." (Ashok Chavan Latest News)

मोदींचं वलय -

'काँग्रेस सत्तेत असतानाही मी दहा वर्षे सत्तेच्या बाहेर होतो. पदावर नव्हतो. नंतर प्रदेशाध्यक्षपद मिळाले. सत्ता हा हेतू नाही. सत्तेने फरक पडतोच. लोकांना कामं हवी आहेत. तुम्ही सत्तेत आहात की नाही याच्याशी त्यांना घेणं देणं नसतं. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे सत्तेत असताना लोकांचं काम करता येतं. देशपातळीवर मोदींबाबत वलंय आहे. ते काम करत आहेत', असे शेवटी अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com