Sudhir Mungantiwar On MVA : 'मविआ'च्या पत्रकार परिषदेनंतर मुनगंटीवारांनी डिवचलं, म्हणाले, कासव एकदाच जिंकतं पण ससा...

Sudhir Mungantiwar On Maha vikas Aghadi press conference : "महाविकास आघाडीच्या धन्यवाद सभेतून पंतप्रधान मोदींना कमी लेखण्याचा प्रकार हा आठ खासदारांचं नेतृत्व करणाऱ्यांनी करणं म्हणजे 'सात अजूबे इस दुनिया में आणि आठवा म्हणजे ही पत्रकार परिषद."
Sudhir Mungantiwar On Maha vikas Aghadi
Sudhir Mungantiwar On Maha vikas Aghadi Sarkarnama

Sudhir Mungantiwar On Sharad Pawar : एखाद्या विषयात जास्त गुण प्राप्त झाले तर गुणवंत होत नाही. फक्त दहा जागा लढवत आठ खासदार निवडून आलेले संघर्ष करण्याची भाषा करत आहेत, ही 21 व्या शतकातला सर्वात मोठी गंमत आहे.

पवारसाहेबांनी सगळे पक्ष गोळा करुन निवडणूक लढवली. मात्र, तरीही त्यांना भाजप एवढ्या जागा जिंकता आल्या नाहीत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या नेतृत्वात 240 जागा जिंकल्या, त्यांच्याशी पवारसाहेब स्पर्धा करत आहेत, असं म्हणत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी (ता.15 जून) रोजी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला लगावला. विधानसभेला जेवढ्या जागांवर मोदींच्या सभा होतील ते आमच्या फायद्याचं ठरेल, असं पवार म्हणाले. शिवाय विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी होईल असा विश्वासही या पत्रकार परिषदेत आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

याच पत्रकार परिषदेतवर भाष्य करताना मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडीवर घणाघात केला. शिवाय आघाडीची पत्रकार परिषद म्हणजे लोकांना भ्रमित करण्याचे काम असल्याचंही ते म्हणाले. मुनगंटीवार म्हणाले, "महाविकास आघाडीच्या धन्यवाद सभेतून पंतप्रधान मोदींना कमी लेखण्याचा प्रकार हा आठ खासदारांचं नेतृत्व करणाऱ्यांनी करणं म्हणजे 'सात अजूबे इस दुनिया में आणि आठवा म्हणजे ही पत्रकार परिषद," अशी बोचरी टीका त्यांनी केली.

तर या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदणार असा नेरेटीव्ह सेट केला. त्यांनी लोकांना भ्रमित करण्याचं कामं केलं. मात्र, ससा कासवाच्या कथेत एकदाच फक्त कासव जिंकला. मात्र, ससा कायमच जिंकतो. एकदा जिंकला म्हणजे तुम्ही सतत जिंकाल असं होत नाही, असं म्हणत मुनगंटीवार यांनी आघाडीच्या विधानसभा जिंकण्याचा दावा खोडून काढला.

Sudhir Mungantiwar On Maha vikas Aghadi
Eknath Khadse News : आपल्याच 'इच्छे'ने अडचणीत आलेल्या भुजबळांच्या मदतीला धावला अखेर 'हा' जुना सवंगडी

शिवाय 128 विधानसभेत आम्ही पुढे आहेत, त्यामुळे पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार येणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी आघाडीला भरभरून मते दिल्याची गोष्ट खरी आहे. मराठी माणसांनी मात्र त्यांना कमी मतदान दिलं. काही विशिष्ट समुदायाने आम्हाला मतदान केलं नसल्याची कबुली मुनगंटीवारांनी दिली.

ती शिवसेनेची भूमिका नव्हे

तर शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राइक रेट जास्त असल्याने महायुतीमध्ये आम्हीच मोठे भाऊ असल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे. याबाबत प्रश्न विचारला असता, मुनगंटीवार म्हणाले, "एखादा कर्यकर्ता उत्साहात बोलत असेल तर ती काय शिवसेनेची भूमिका असू शकत नाही." असं म्हणत त्यांनी शिरसाटांवर बोलणं टाळलं.

Sudhir Mungantiwar On Maha vikas Aghadi
Video Mahayuti News : थेट स्ट्राइक रेट सांगत शिंदे गटाच्या 'या' नेत्याचा मोठा दावा; भाजप नव्हे तर महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ

भुजबळ नाराज आहेत असं वाटत नाही

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाराजीच्या चर्चांवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ते नाराज आहेत, असं कधीच वाटत नाही. मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर नाराज आहे हे समजायला हवं, पण तसे काही नसेल. त्यांनी नाराजीबाबात काही खासगीत बोललं असेल असे वाटत नाही, अशी मिश्लिल टिपण्णी त्यांनी भुजबळांच्या नाराजीबाबातच्या चर्चांवर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com