Mihir Kotecha Office vandalized: मुलुंडमध्ये राडा, भाजप-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले; मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड

Loksabha Election : . मतदानाला फक्त तीन दिवस बाकी असताना कोटेच्या यांच्याकडून पैसे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
 Mihir Kotecha office vandalized
Mihir Kotecha office vandalizedsarkarnama

Loksabha Election : ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मिहीर कोटेच्या Mihir Kotecha यांच्या कार्यलयाच्या परिसरात समोरासमोर आले. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. या राड्यामध्ये मिहीर कोटेच्या यांच्या कार्यलयाची तोडफोड ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यानी केली असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले.

 Mihir Kotecha office vandalized
Narendra Modi Mumbai Sabha: राज ठाकरेंचे मोदी-शहा कनेक्शन व्हाया फडणवीसच..., पाहा कोणाची खुर्ची कुठे कशी?

ईशान्य मुंबईमध्ये भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचे आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजय पाटील यांच्यामध्ये काटे की टक्कर आहे. मतदानाला फक्त तीन दिवस बाकी असताना कोटेच्या यांच्याकडून पैसे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते समोरासमोर आल्याने एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना पकडून पोलिस व्हॅनमध्ये बसवले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बीजेपी हमसे ठरती है, पोलिस को आगे करती है, अशी घोषणा केली.

ठाकरे गटाच्या Uddhav Thackeray Group कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड झाली तेव्हा मिहीर कोटेचा हे शिवतीर्थावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला उपस्थित होते. राजकीय षडयंत्रातून हा हल्ला केला गेला असल्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. आम्ही सभेला जात असताना ठाकरे गटाचे कार्यकर्ते कोटेच्या यांच्या कार्यालयावर आले आणि त्यांनी तोडफोड केली असे भाजप BJP कार्यकर्ते म्हणाले.

देंवेंद्र फडणीसांची कार्यलयाला भेट

मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्याची कळल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयामध्ये पोहचले. त्यांनी तेथे पाहणी करत या हल्ल्याच्या माहिती घेतली. त्यांच्यासोबत भाजप नेते प्रसाद लाड हे देखील उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com