NCP News : मुंबई महापालिकेची धुरा नवाब मलिकांच्या खांद्यावर; महायुती झाल्यास भाजपला त्यांच्यासोबतच करावं लागणार काम

BMC Election News : महापालिका निवडणुकीसाठी माजी मंत्री नवाब मलिक हे पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. त्यामुळे येत्या काळात महायुती झाल्यास भाजपला त्यांच्यासोबतच काम करावे लागणार आहे.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच पक्षात आतापासूनच वेगवान घडामोडी घडत आहेत. निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. येत्या काळात महायुती मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्रित लढणार आहे. त्यातच माजी खासदार समीर भुजबळ यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे गेल्या दहा महिन्यापासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मुंबईत अध्यक्षच मिळत नाही.

त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक ही राष्ट्रवादीला मुंबई अध्यक्षाविनाच लढवावी लागणार आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी माजी मंत्री नवाब मलिक हे पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. त्यामुळे येत्या काळात महायुती झाल्यास भाजपला त्यांच्यासोबतच काम करावे लागणार आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक गेल्या चार वर्षांपासून रखडलेली आहे. या निवडणुकीला दिवाळीनंतर मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या 10 महिन्यांपासून अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला मात्र अध्यक्ष मिळत नसल्याने पद रिक्त आहे.

Nawab Malik
BJP Ramesh Karad controversial statement : फडणवीसाच्या शिलेदारांचं विधान, रोहित पवारांनी हेरलं; म्हणाले, 'तमाम जनतेचा अपमान...'

त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक ही राष्ट्रवादीला मुंबई अध्यक्षाविनाच लढवावी लागण्याची शक्यता वाटत असतानाच आता महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी खासदार समीर भुजबळ (Sameer bhujbal) यांनी अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला.

Nawab Malik
Uddhav-Raj Thackeray : ठाकरे बंधू एकत्र आले तरी सत्तेपर्यंत पोहचणे अवघड... काँग्रेसची गरज लागणारच!

त्यामुळे गेल्या दहा महिन्यात नव्या अध्यक्षाची निवडच झाली नाही. त्यामुळे आता मुंबई महानगरसाठी अध्यक्षपद जाहीर केले नसले तरी राष्ट्रवादीने यावर तोडगा काढला आहे. नवाब मलिक हे मुंबई महापालिका निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

Nawab Malik
Eknath Shinde Trouble : आदिती तटकरे अन् गिरीश महाजनांना मान : 9 महिन्यांनंतर नाशिक-रायगडचं चित्र क्लिअर, शिंदेंची कोंडी

निवडणूक समिती स्थापन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि शिवाजीराव नलावडे काम करणार आहेत. या समितीमध्ये सना मलिक, झिशान सिद्धकी, संतोष धुवाळी यांचा समावेश आहे.

Nawab Malik
Rahul Gandhi court statement: मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींनी कोर्टात दिली लेखी माहिती

दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक हे राष्ट्रवादी पक्षाची धुरा सांभाळणार असले तरी त्यांना महायुतीमध्ये घेत असताना भाजपने विरोध केला होता. त्यामुळे येत्या काळात महायुती झाल्यास भाजपला त्यांच्यासोबतच काम करावे लागणार आहे. त्यामुळे मुंबईत भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेना काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nawab Malik
Shiv Sena Politics : शिवसेनेला भाजपपेक्षा राष्ट्रवादीवर भरवसा, स्थानिक निवडणुकीसाठी डोक्यात शिजला वेगळा प्लॅन..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com