Shivsena UBT Vs BJP : 'उतलो, मातलो, घेतला वसा टाकला गे माय...' शेलारांनी गोंधळ गीतावरून उद्धव ठाकरेंना डिवचलं

Ashish Shelar On Shivsena Gondhal Song : आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असातना पंढरपूरची वारी रोखली, लालबागच्या राजाची परंपरा राखली नाही असा उल्लेख ट्विटमध्ये केला आहे. शिवाय देवीचा कोप झाला म्हणून ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray, Ashish Shelar
Uddhav Thackeray, Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

Mumabi News, 03 Oct : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पक्षांनी आपापल्या पक्षाचं गीत तयार केलं आहे. भाजपचं 'देवाभाऊ' तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 'दादांचा वादा' अशी गाणी लॉन्च केली आहेत.

अशातच आता शिवसेना (Shivsena UBT) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी 'असुरांचा संहार करायला मशाल हाती दे' हे प्रचार गीत लॉन्च केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या गोंधळ गीत लॉन्च करण्यात आलं.

ठाकरेंच्या शिवसेनेच्या याच गोंधळ गीतावरून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. शेलार यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचं गाणं असं असायला हवं होतं म्हणत एक फोटो शेअर केला आहे.

Uddhav Thackeray, Ashish Shelar
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांच्या भाजप सोडण्यावर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया : ‘मला काय मिळणार, हा विचार..’

या गाण्यात त्यांनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असातना पंढरपूरची वारी रोखली, लालबागच्या राजाची परंपरा राखली नाही असा उल्लेख केला आहे. शिवाय देवीचा कोप झाला म्हणून ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शेलार यांनी शेअर केलेल्या फोटोत लिहिलं आहे, "उतलो माय... मातलो गं माय.. घेतला वसा टाकला गे माय.

गणपतीची आरती हातात घेतली नव्हती, पांडूरंगाची तुळसी माळ गळ्यात घातली नव्हती.

पंढरपूरात जाणारी वारकऱ्यांची वारी रोखली होती, लालबागच्या राजाची परंपरा राखली नव्हती.

हे कुलस्वामिनी एकवीरा आई मुख्यमंत्री झाल्यावर, तुझी पायरी सुध्दा दुरुस्त केली नव्हती.

अहंकाराच्या दैत्याने घेरले होते माय... सत्ता गेली, पक्ष गेला, चिन्ह गेले, तुझा कोप झाला गं माय.

आता जाग आली माय म्हणून म्हणतो, दार उघड बये... दार उघड...

माझ्यातील अहंकाराला जाळण्यासाठी सत्वरी भूवरी ये... अंबे उदो.. उदो..उदो!"

तर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या गोंधळ गीताचं अनावरण झालं. यावेळी त्यांनी हे गीत लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना राज्यभरातील शिवसैनिकांना केल्या आहेत. ठाकरेंच्या गीताचे बोल पुढीलप्रमाणे आहेत.

दार उघड बये दार उघड

सत्वरी भुवरी ये गं अंबे, सत्वरी भुवरी ये…

आदिमाये तू ये, आदिशक्ती ये, आसूरांचा संहार करण्यासाठी, मशाल हाती दे

सत्वरी भूवरी ये गं अंबे… उधे उधे उधे….

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com