Thackeray Vs Shinde : "भाजप आमदार मुख्यमंत्र्यांना गद्दार म्हणतो, मग...", ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल

Ganpat Gaikwad Firing : "गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारानंतर महाराष्ट्राचं एक वेगळं चित्र देशासमोर येतंय", असंही अंबादास दानवेंनी म्हटलं.
Uddhav Thackeray Ganpat Gaikwad Eknath Shinde
Uddhav Thackeray Ganpat Gaikwad Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ambadas Danve On Ganpat Gaikwad : कल्याण पूर्वमधील भाजप आमदार गणपत गायकवाड ( Ganpat Gaikwad ) यांनी उल्हासनगर शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी गोळीबार केला. आमदार गायकवाडांनी हिललाईन पोलीस ठाण्यातच महेश यांच्यावर केलेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून शिंदे आणि भाजप सरकारवर सडकून टीका केली जात आहे. आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना लक्ष्य केलं आहे.

Uddhav Thackeray Ganpat Gaikwad Eknath Shinde
Ganpat Gaikwad Firing : धाड..धाड..धाड..! महेश गायकवाडांना कुठे-कुठे लागल्या सहा गोळ्या ?

"आमदार गायकवाडांनी महेश यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्या. भाजप विरोधी पक्षात असता, तर या घटनेबाबत काय मागणी केली असती?" असा सवाल दानवेंनी उपस्थित केला आहे.

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

"...तर भाजपनं आमदाराला पक्षाबाहेर काढायला हवं होतं"

"ही घटना घडल्यानंतर महाराष्ट्राचा बिहार झाला की काय अशा पद्धतीची बदनामी केली जात आहे. गोळीबारानंतर महाराष्ट्राचं एक वेगळं चित्र देशासमोर येतंय. भाजप खून, गोळीबार, खंडण्यांच्याविरोधात आहे. मग, भाजपनं आमदाराला आतापर्यंत पक्षातून बाहेर काढायला हवं होतं," असं दानवेंनी म्हटलं.

Uddhav Thackeray Ganpat Gaikwad Eknath Shinde
Ganpat Gaikwad Firing Case : बंदुकीच्या धाकावर महाराष्ट्रात राज्य करता येणार नाही...!

"गोळीबाराच्या घटनेमुळे महाराष्ट्राला कलंक"

"भाजप आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणतो. मग, आम्ही गद्दार म्हटलं की, मुख्यमंत्र्यांना मिरच्या लागतात. घडलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्राला कलंक लागलाय. महाराष्ट्राला कलंक शब्द लागण्यास भाजप कारणीभूत आहे. बाकीच्यांनी एखाद्याचा गळा जरी पकडला असता, तर भाजपनं आकांडतांडव केला असता," अशी टीका दानवेंनी केली आहे.

Edited By : Akshay Sabale

Uddhav Thackeray Ganpat Gaikwad Eknath Shinde
Ganpat Gaikwad Firing : ज्या वादातून महेश गायकवाडांवर हल्ला, ते तक्रारदारच समोर; केली 'ही' मोठी मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com