Nitesh Rane : 'हिच ती वेळ..उरलेलं दुकान बंद करण्याची..' ; राणेंचा ठाकरेंना टोला

Nitesh Rane slams Uddhav Thackeray : राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे.
Nitesh Rane & Uddhav Thakre
Nitesh Rane & Uddhav ThakreSarkarnama
Published on
Updated on

Nitesh Rane slams Uddhav Thackeray : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अजूनही काँग्रेसमध्ये खदखद कायम आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस वाचवायची असेल तर नाना पटोले यांना हटवा अशी मागणी या नेत्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

अशातच भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे. यात ठाकरे गटाचे नेते, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे व अन्य नेत्याचे संभाषण आहे. ते नाना पटोलेंची फिरकी घेत आहेत. यावरुन नितेश राणेंनी ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

Nitesh Rane & Uddhav Thakre
Mumbai News : फडणवीसांची मोठी घोषणा ; झोपडपट्टीधारकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार, अडीच लाखात..

"हिच ती वेळ..उरलेलं दुकान बंद करण्याची.." अशा शब्दात नितेश राणेंनी ठाकरे यांच्यावर टोला लगावला आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेली प्रतिक्रिया अंबादास दानवे हे उपस्थितांना सांगत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेस वाचवायची असेल तर नाना पटोले यांना हटवा, अशी मागणी काही काँग्रेस नेत्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. या नेत्यांमध्ये विजय वडेट्टीवार, सुनील केदार, शिवाजीराव मोघे आणि संजय निरुपम या नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस नेत्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Nitesh Rane & Uddhav Thakre
Devendra Fadnavis On Ambedkar : आंबेडकरांचा 'मविआ'वरुन ठाकरेंना मोलाचा सल्ला; फडणवीस म्हणाले,''बाळासाहेब कधी कधी..''

या नेत्यांमध्ये विजय वडेट्टीवार, सुनील केदार, शिवाजीराव मोघे आणि संजय निरुपम या नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस नेत्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com