लाडांची जीभ घसरली; पटोलेंचा एकेरी उल्लेख करत 'सागर'वर येण्याचे दिले आव्हान

काँग्रेसने राज्यभर आंदोलन करत पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
Nana Patole, Prasad Lad
Nana Patole, Prasad Ladsarkarnama

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेत बोलताना काँग्रेसने मुंबईमध्ये कामगारांना मोफत तिकीटे वाटली. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यात कोरोना पसरला असा आरोप केला होता. त्यावरुन काँग्रेसने राज्यभर आंदोलन करत पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तर सोमवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुंबईतील सागर बंगल्यासमोर आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला होता. त्यावरुन भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी पटोलेंचा एकेरी भाषेत उल्लेख करत बंगल्यासमोर येवूनच दाखव, असा इशारा दिला.

लाड यांनी या संदर्भात एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले ''नाना तुझ्या आव्हानाला प्रति आव्हान देतोय. हिंमत आहे तर सकाळी 10 वाजता येऊनच दाखव. नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही भाजपवासी नाही, सागरवर तू ये पाहतो तू परत कसा जातो ते'', अशा शब्दातात पटोले यांना आव्हाण दिले आहे. यावरुन आता काँग्रेस आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लाड यांच्या टिकेवरुन आता राजकारण तापले आहे.

Nana Patole, Prasad Lad
सेलूच्या नगराध्यक्षासह राष्ट्रवादीचे २० नगरसेवक काॅंग्रेसमध्ये ; मालेगावातील फोडाफोडीची परतफेड

दरम्यान, पटोले म्हणाले होते की ''देशभरातील तरूण आज बेरोजगार झाले आहेत. तरूणांना रोजगार देता येत नाही. त्यामुळे हिजाबसारखे मुद्दे चर्चेत आणले जात आहेत. निवडणुका आल्या की समाजात भाजप फूट पाडत असतो. भाजपचा सर्व निवडणुकांमध्ये पराभव होत आहे. त्यामुळे त्यांना असे मुद्दे चर्चेत आणावे लागतात, असे पटोले म्हणाले होते. रोजगार देणे, देश वाचवणे ही सध्याची वेळ आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राचा अपमान करत असताना भाजपचे खासदार बाक वाजवत होते. याचा निषेध म्हणून फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले होते.

Nana Patole, Prasad Lad
सोमय्यांचा सत्कार महागात; शहराध्यक्षांसह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

या वेळी पटोले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही कडाडून टीका केली. १० मार्चनंतर राज्यात भाजपचे सरकार स्थापन करणार असल्याचे वक्तव्य पाटील यांनी केले होते. त्यावर बोलताना पटोले म्हणाले, "भाजपला सत्तेचा मानसिक रोग झाला आहे. पहाटेचे सरकार स्थापन झाल्यापासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. सतत अशी वक्तव्य करून राज्याची आणि जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा टोला पटोले यांनी लगावला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com