सोमय्यांचा सत्कार महागात; शहराध्यक्षांसह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

गेल्या शनिवारी (ता. ५ फेब्रुवारी) किरीट सोमय्या हे जंबो कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी पुण्यात आले होते.
Kirit somaiya
Kirit somaiya Twitter/@jagdish mulik

पुणे : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुणे महापालिकेच्या (PMC) ज्या पायऱ्यांवर शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याच पायरीवर त्यांचा भाजप कार्यकर्त्यांनी (BJP) शनिवारी (ता.11 फेब्रुवारी) सत्कार केला. पोलिसांनी परवानगी नाकारली असतांनाही पुणे भाजपच्या वतीने सोमय्यांचा सत्कार केला गेला. मात्र हे सत्काराचं प्रकरण भाजपच्या अंगलट आले आहे.

किरीट सोमय्यांच्या सत्कार कार्यक्रम प्रकरणी भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह इतर जणांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियम डावलून जमाव जमवल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये 200 ते 300 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kirit somaiya
सोमय्यांचा सत्कार केलेली पायरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्राने धुतली

सत्काराला परवानगी नाकारली असतानाही भाजप नेते आणि कार्यकर्ते धक्काबुक्की करत महापालिकेच्या आवारात घूसले आणि ज्या पायरीवर ते पडले होते. तिथे त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर , नगरसेवक दीपक पोटे, प्रदीप देसरडा दत्ता खाडे, या प्रमुख कार्यकर्त्यासह दोनशे ते अडीचशे जणावर शिवाजीनगर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या शनिवारी (ता. ५ फेब्रुवारी) किरीट सोमय्या हे जंबो कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी पुण्यात आले होते. तक्रार दिल्यानंतर सोमय्या हे उपायुक्तांची भेट घेण्यासाठी पुणे महापालिका कार्यालयात गेले हेाते. त्यावेळी शिवसैनिक आणि सोमय्या हे आमने सामने आले. त्यावेळी झालेल्या धक्काबुक्कीमध्ये सोमय्या पळता पळता पायऱ्यांवर पडले आणि जखमी झाले. त्यानंतर भाजपने त्याच ठिकाणी सोमय्यांचा सत्कार करणार असल्याचे जाहीर केले होते.

Kirit somaiya
वाद पेटला : सोमय्यांच्या सत्काराला परवानगी नाकारली; भाजप कार्यक्रमावर ठाम!

मात्र महापालिका आवारात सोमय्या यांचा सत्कार करण्यास पालिका प्रशासनाने परवानगी नाकारली. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आंदोलनाला परवानगी दिली गेली. मग आमच्याच कार्यक्रमांना परवानगी का नाकारता, असे प्रश्न जगदीश मुळीक यांनी उपस्थित करत आम्ही सोमय्या यांचा सत्कार करणार म्हणजे करणार, असे आव्हानच सरकारला दिले.

इतकेच नव्हे तर सोमय्यांना महापालिकेत येण्यासाठी हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा दिले होते. त्यानंतर भाजपने परवानगी नसतानाही पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार केला. यावेळी ही भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी जमवून नियम मोडल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी जवळपास 200 ते 300 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकारने भाजप कार्यकर्त्यांवर सुडाच्या भावनेतून कारवाई केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने विविध आंदोलने आणि मोठा जमाव जमवून जाहीर कार्यक्रम केले. परंतु त्यांचावर कारवाई करण्यात आली नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर महापालिकेत प्राणघातक हल्ला करण्यात आला. परंतु गुन्हेगारांवर सौम्य कलमे लावून त्यांना सोडून देण्याचा प्रयत्न केला.

राज्य सरकार सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरल्याने सुडाच्या भावनेतून कारवाई करीत आहे. पुणे पोलिस सरकारच्या दबावाखाली आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. असे कितीही गुन्हे दाखल केले तरी भाजप कार्यकर्ते मागे हटणार नाहीत. सरकारचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार सातत्याने जनतेसमोर आणू. पुणेकर जनता या सरकारला नक्की धडा शिकवेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com