Ravindra Chavan : चेक्सचा शर्ट, चव्हाण आणि चेकमेट...!

BJP MLA Ravindra Chavan : भाजप नेते रवींद्र चव्हाण त्यांच्या पेहरावानं बदलली राजकीय प्रतिमा
BJP MLA Ravindra Chavan
BJP MLA Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on

Dombivli News : राजकीय बडी असामी म्हटलं की, डोळ्यासमोर उभी राहते ती त्यांची पारंपरिक प्रतिमा. म्हणजे मस्तपैकी आणि तेवढाच महागडा पांढराशुभ्र शर्ट किंवा कुर्ता, त्यावर चढवलेलं झक्कास जॅकेट आणि कोरा करकरीत पायजमा! शिवाय हाताला महागडं घड्याळ, जमलंच तर हातात सोन्याचं ब्रेसलेट. मात्र, याला शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याचा अपवाद आहे. ते आहेत रवींद्र चव्हाण. होय तेच भाजपचे डोंबिवलीचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण!

राजकारणी माणूस आणि तोही मंत्री असला तर पांढऱ्याशुभ्र वेशभूषेत आणि तशाच तोऱ्यात वावरतो. मात्र, भाजप (BJP) आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचा बाजच निराळा आहे. कारण चेक्सचा शर्ट ही त्यांची ओळख बनली आहे. साधा चेक्सचा शर्ट, जीन्सची पँट आणि आणि पायात स्पोर्ट्स शूज म्हणजे रवींद्र चव्हाण ही त्यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक झाली आहे.

BJP MLA Ravindra Chavan
Ravindra Chavan News : विकास म्हात्रेंच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी उच्चारला 'हा' एकच शब्द

ते कुठेही असोत, त्यांच्या या वेशभूषेत बदल नसतो. एक-दोन नव्हे तर तब्बल 15 वर्षांपासून रवींद्र चव्हाण यांच कपड्यात सगळीकडे वापरत आहेत. मग ते मुंबईत असोत वा दिल्लीत!त्यामुळेच 'सरकारनामा'ला त्यांच्या पेहरावाचं गूढ उकलण्याची इच्छा झाली. त्यानंतर समोर आलं ते रवींद्र चव्हाण यांनी साधेपणा अंगी बाणावा, यासाठी जाणीवपूर्वक केलेले स्वत:मधील बदल!

वास्तविक रवींद्र चव्हाण(Ravindra Chavan) त्यांच्या राजकीय करीअरच्या सुरुवातीच्या काळात इतर राजकीय नेत्यांसारखेच होते. म्हणजे सोबत भरपूर कार्यकर्ते, बॉडीगार्ड घेऊन ते वावरायचे. सर्वांशी अंतर ठेवून असायचे. मात्र, जसजसा त्यांचा संपर्क वाढला तेव्हा त्यांना लोकांचं महत्त्व कळलं आणि आपल्यात बदल करायला हवेत, याची जाणीव त्यांना झाली. त्यानंतर त्यांचा लूक बदलला तो कायमचाच!

लोकांशी संपर्क साधायचा, त्यांना आपलंसं करायचं तर त्यांच्यासारखं दिसायला हवं, हे लक्षात आलं. शिवाय ते डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक शहरात वावरत असल्यामुळे लोकांशी जोडणं किती महत्त्वाचं आहे, हे त्यांनी ओळखलं होतं. त्यामुळे बदलाची सुरवात त्यांनी पेहरावापासून केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, राजकारणी पेहरावापेक्षा सामान्यांच्या पेहरावात वावरलो तर लोक अधिक जवळ येतात. खरंतर चेक्सचे शर्ट राजकारणी पसंत करत नाहीत. चव्हाणांबाबत वेगळं घडलं, त्यांना चेक्सचे शर्ट लकी ठरले

चेक्सचा शर्ट ठरला लकी फॅक्टर...

2007 मध्ये ते कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombivli) महापालिकेत स्थायी समितीचे सभापती झाले. त्यानंतर 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. आमदार झाले तेव्हा चेक्सचा शर्ट आपल्यासाठी लकी फॅक्टर असल्याचं त्यांना जाणवलं.

दीड दशकापासून रवींद्र चव्हाण कुठेही जाताना पूर्वीसारखा सोबत कार्यकर्त्यांचा गोतावळा घेऊन जात नाहीत. राज्यात कुठेही गेले तरी, चेक्सचा शर्ट, जीन्सची पँट आणि स्पोर्ट्स शूज हा जणू त्यांचा युनिफॉर्म झाला आहे. एवढेच कशाला अगदी राज्यमंत्री तसेच कॅबिनेटमंत्रिपदाचा शपथविधी सोहळ्यातही त्यांनी चेक्स शर्टलाच पसंती दिली होती.

BJP MLA Ravindra Chavan
Shivsena (UBT) News : अंबादास दानवेंचा 'जनाधिकार' की लोकसभेसाठी 'जनाधार' ?

डोंबिवलीत तर ते अगदी कुठेही कधीही दिसतात. तुमच्या आमच्यासारखा पेहराव केल्यामुळे अनेकदा आपल्या बाजूला एक मोठ्या खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण आहेत, हे कुणाच्या पटकन लक्षात येत नाही, हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे.

रवींद्र चव्हाण हे राजकारणात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे राजकीय पटावरील चेकमेटमध्येही ते तरबेज आहेत. त्यामुळेच चेक्सचे शर्ट, चव्हाण आणि चेकमेट हे समीकरणा तंतोतंत जुळून आलंय.

(Edited by Avinash Chandane)

BJP MLA Ravindra Chavan
Sushilkumar Shinde : 'हिंदू दहशतवाद' हा शब्द वापरणाऱ्या शिंदेंसाठी भाजप पायघड्या घालणार का...?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com