MLA Yogesh Sagar : ...अन् भाजप आमदार योगेश सागर यांनी 'BMC' अधिकाऱ्यांची भर रस्त्यातच काढली खरडपट्टी!

MLA Yogesh Sagar and BMC Officers : या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, याप्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
MLA Yogesh Sagar and BMC Officers
MLA Yogesh Sagar and BMC OfficersSarkarnama

Yogesh Sagar at Kandivali : भाजप आमदार योगेश सगर यांनी रस्त्याचं झालेलं निकृष्ट दर्जाच काम पाहून बीएमसी अधिकाऱ्यांना भर रस्त्यातच समारोसमोर नेत झापलं आहे. शिवाय, फोनवरून कंत्राटदाराचीही चांगलीच खरपडट्टी काढली आहे.

भाजप आमदाराच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाल आहे आणि याची सर्वत्र चांगलीच चर्चाही होत आहे. हा व्हिडिओ कालचा असून, कांदिवली पश्चिम येथील माथूर दास रोड येथील आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Yogesh Sagar and BMC Officers
Suresh Mhatre Vs Kapil Patil: निकालाआधीच भिवंडीत राजकारण तापलं, बाळ्यामामांचा कपिल पाटलांवर 'हा' गंभीर आरोप; 'मनोज म्हात्रे हत्या प्रकरणात...'

योगेश सागर माथूर दास रोड परिसरात पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांना निकृष्ट दर्जाचे काम पाहून त्यांनी बीएमसी(BMC) अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी नागरिकांच्या उपस्थितीत झापण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी संबंधित कंत्राटदारासही फोन केला आणि धारेवर धरलं.

आमदार सागर(MLA Yogesh Sagar) बीएमसी अधिकाऱ्यांना म्हणाले 'तुमची विभागही चोर आहेत, समन्वय नाही. केवळ जाबाबदारी एकमेकांच्या अंगावर झटकण्याचं काम केलं जातं. केवळ फुकट खायला वर बसले आहेत आणि संध्याकाळी सेटलमेंट होते.'

MLA Yogesh Sagar and BMC Officers
BMC News : 'बीएमसी'त मोठा घोटाळा? मुख्यमंत्री शिंदेंच्या 'ड्रीम प्रोजेक्ट' वादात; कंत्राटदाराने थेट पुरावेच दिले

दरम्यान चारकोप विधानसभेचे भाजप आमदार योगेश सागर यांच्या या वर्तनानंतर बीएमसी अधिकाऱ्यांमध्ये नाराजीची सूर असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ आमदार सागर यांनी आपल्या फेसबुक पेजवरही शेअर केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com