BMC Election : भाजपला नको असणारा नेता अजितदादांना काही करून हवाच आहे! मुंबईतील शिलेदार चर्चेला पाठवून लावली फिल्डिंग

BMC Election : नवाब मलिकांच्या भूमिकेमुळे मुंबईतील भाजप-राष्ट्रवादी युती अडचणीत आली आहे. तिढा सोडवण्यासाठी अजित पवार यांनी शिवाजीराव नलावडे यांना भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे चर्चेसाठी पाठवले.
Ajit Pawar attempts to resolve BJP–NCP differences over Nawab Malik ahead of Mumbai municipal elections.
Ajit Pawar attempts to resolve BJP–NCP differences over Nawab Malik ahead of Mumbai municipal elections.Sarkarnama
Published on
Updated on

BMC Election : मुंबईतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संभाव्य युती माजी मंत्री नवाब मलिक यांच्यामुळे अडचणीत आली आहे. दहशतवाद्यांशी संबंधित जमीन खरेदी असल्याचे आरोपांमुळे मलिक यांना मुंबई महापालिका निवडणुकीपासून लांब ठेवावे अशी भूमिका भाजपने घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस मात्र मलिक यांच्याच नेतृत्वात या निवडणुका लढण्यावर ठाम आहे. यावर उपाय म्हणून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव नलावडे यांना मैदानात उतरवले आहे.

अजित पवार यांनी नलावडे यांना मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पाठवून चर्चा केली. नवाब मलिक यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळे ताठर भूमिका घेऊ नये. महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवू असे राष्ट्रवादीने भाजपला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मलिकांकडे सूत्र असेपर्यंत युती नाहीच असे शेलार यांनी पुन्हा स्पष्ट केले.

भाजप आणि शिवसेनेची मुंबईतील भाजप कार्यालयात एक बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निमंत्रण दिले नाही. राष्ट्रवादीला निमंत्रण न देण्यामागे नवाब मलिक कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. भाजपच्या काही नेत्यांनी मुंबईत नवाब मलिक यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार असेल तर राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे. मलिकांशिवाय निवडणुका लढवण्यावर भाजप ठाम आहे.

Ajit Pawar attempts to resolve BJP–NCP differences over Nawab Malik ahead of Mumbai municipal elections.
BMC elections 2025 : भाजपने हट्ट धरताच अजितदादांनीही 'इगो'वर घेतलं..., एका व्यक्तीमुळे भाजप-राष्ट्रवादीची युती घोषणेपूर्वीच संकटात

कोण आहेत शिवाजीराव नलावडे?

शिवाजीराव नलावडे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. सध्या ते मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. शिवाय, मुंबई शहरात दोन शाळा त्यांनी उभारल्या आहेत. त्यामुळे शिक्षण मित्र म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांनी यापूर्वी भांडूप पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आहे. तसेच पदवीधर मतदारसंघातूनही त्यांनी नशीब आजमावले होते. गतवर्षी राष्ट्रवादीने मुंबई शिक्षक मतदारसंघासाठीही उमेदवारी जाहीर केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com