BMC elections 2025 : भाजपने हट्ट धरताच अजितदादांनीही 'इगो'वर घेतलं..., एका व्यक्तीमुळे भाजप-राष्ट्रवादीची युती घोषणेपूर्वीच संकटात

Mahayuti Nawab Malik Controversy : भाजपने जी भूमिका जाहीर केली आहे. तीच भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे आता भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत केवळ सेना-भाजपची युती होणार की अजितदादांची राष्ट्रवादी मिळून महायुती होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis
BJP and Shiv Sena leaders attend a crucial strategy meeting in Mumbai as Mahayuti faces internal tensions over Nawab Malik’s role in municipal elections.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 16 Dec : मुंबईसह राज्यभरातील महानगरपालिका निवडणुकींच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर करताच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. तिकडे मुंबई महापालिकेत आपली सत्ता आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामुळे मुंबईत महायुतीला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आज भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईतील भाजप कार्यालयात एक बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निमंत्रण पाठवलं नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

राष्ट्रवादीला निमंत्रण न देण्यामागे नवाब मलिक कारणीभूत असल्याचंही सांगितलं जात आहे. कारण भाजपच्या काही नेत्यांनी अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईत नवाब मलिक यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार असेल तर राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची भूमिका घेकल्याचं सांगितलं जात आहे.

एकीकडे नवाब मलिकांशिवाय निवडणुका लढवण्यावर भाजप ठाम आहे. तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी मलिकांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी महायुतीतून लढणार की इतर कोणत्या पर्यायाची चाचपणी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
BJP vs Shivsena UBT: 'मोदी-शहांना ज्या नावात रस होता, त्याला संघांची मान्यता नव्हती, नव्या अध्यक्षांच्या नेमणुकीने भाजपांतर्गत खळबळ...'

त्यामुळे नवाब मलिक यांच्यामुळे युतीत काहीसा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर मुंबई महापालिकेत भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेसोबत लढण्याचा निर्णय घेतला असला तरी राष्ट्रवादीला दूर ठेवण्याची रणनीती आखल्याचं बोललं जात असून राष्ट्रवादीसाबत युती न करण्यासाठी भाजपने नवाब मलिकांचं कारण पुढं केलं आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Sunil tatkare : तटकरेंविरोधात शिंदेंचा शिलेदार आक्रमक, आरोप करत म्हणाला, 'मी असा बॉम्ब फोडीन की ते...'

दरम्यान, भाजपने जी भूमिका जाहीर केली आहे. तीच भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे आता भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत केवळ सेना-भाजपची युती होणार की अजितदादांची राष्ट्रवादी मिळून महायुती होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com