Solapur Politics: शरद पवार चार वर्षांनंतर 'शिवरत्न'वर; विजयदादांच्या प्रकृतीची केली विचारपूस

Sharad Pawar Meet Vijaysinh Mohite–Patil: मोहिते पाटील कुटुंबियांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपशी घरोबा केला आहे...
Sharad Pawar - Vijaysinh Mohite–Patil
Sharad Pawar - Vijaysinh Mohite–PatilSarkarnama

Solapur Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर जाऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तब्बल चार वर्षांनंतर पवार हे 'शिवरत्न' बंगल्यावर आले होते. या भेटीमुळे सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा पवार आणि मोहिते पाटील समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. सोलापुरातील आयटी पार्कच्या उद्घाटनानंतर पवार यांच्याहस्ते सांगोल्यात शेकापचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख(Ganpatrao Deshmukh) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. त्या कार्यक्रमासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयदादा हेही उपस्थित होते.

Sharad Pawar - Vijaysinh Mohite–Patil
Ganpatrao Deshmukh Statue Inauguration : गणपतराव देशमुख म्हणजे ‘वन मॅन आर्मी’; फडणवीसांकडून आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा

विजयदादा हे व्हिलचेअरवर कार्यक्रमाला आले होते. पवार यांनी व्यासपीठावरच विजयसिंह मोहिते पाटील यांची विचारपूस केली होती. त्यावेळी त्यांना विजयदादा हे आजारी असल्याचे समजले. कार्यक्रम संपल्यानंतर आपण अकलूजला जाऊन मोहिते पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी अकलूजला 'शिवरत्न' बंगल्यावर जाऊन विजयदादांची भेट घेतली.

शरद पवार (Sharad Pawar)हे तब्बल चार वर्षांनंतर 'शिवरत्न' बंगल्यावर आले होते. यापूर्वी 2019 मध्ये कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने पवार हे अकलूजमध्ये आले होते. त्यावेळी ते शिवरत्न बंगल्यावर आले होते. त्यानंतर मोहिते पाटील कुटुंबियांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपशी घरोबा केला आहे, त्यातून पवार आणि मोहिते पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतरही शरद पवार यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्याची आठवण ठेवत रविवारी अकलूजमध्ये जाऊन विजयदादांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Sharad Pawar - Vijaysinh Mohite–Patil
Beed Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर; अमित देशमुखांनी घेतला बीडचा आढावा

विजयसिंह मोहिते पाटील(VijaySinh Mohite Patil) हे काही महिन्यांपूर्वी पाय घसरून पडले आहेत. तेव्हापासून ते आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा अवस्थेतही भाई गणपतराव देशमुख यांच्यावरील प्रेमापोटी ते रविवारी सांगोल्यातील कार्यक्रमाला आले होते.राष्ट्रवादीपासून दुरावल्यानंतरही शरद पवार यांनी मोहिते पाटील यांची भेट घेऊन चौकशी करत वैयक्तिक संबंध कसे जपावेत,हे नव्या पिढीतील राजकारण्यांना दाखवून दिले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com