Mahayuti Politics : "थांबावं लागतं..."; मुनगंटीवार-भुजबळांच्या नाराजीवर भाजपकडून मोठी प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal And Sudhir Mungantiwar : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी (ता.15 डिसेंबर) झाला. यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकूण 39 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या मंत्रिमंडळात अनेक दिग्गज आणि जुन्या नेत्यांना वगळण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar, Chhagan Bhujbal, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar, Chhagan Bhujbal, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 17 Dec : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी (ता.15 डिसेंबर) झाला. यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकूण 39 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या मंत्रिमंडळात अनेक दिग्गज आणि जुन्या नेत्यांना वगळण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

यामुळेच तीनही पक्षातील ज्या नेत्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवलं आहे त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या दोन्ही नेत्यांनी आपली नाराजी उघड दर्शवली आहे.

"जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना"; असं म्हणत छगन भुजबळ यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्त केली. तर "ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रीपद मिळते. मला मंत्रीपद मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला आश्वासन दिलं होतं, तरी मला मंत्रिपद मिळालं नाही, पण मी नाराज नाही." असं म्हणत सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मनातील खदखद बाहेर काढली आहे.

या नेत्यांनी माध्यमांसमोर उघड नाराजी व्यक्त करताच भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोन्ही नेत्यांना उद्देशून मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, "खरंतर ही काही नाराजीची गोष्ट नाही. नेत्यांना काही काळापुरतं थांबावं लागतं आणि पुढे जावं लागतं. पुन्हा थांबावं लागतं, पुन्हा पुढे जावं लागतं.

Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar, Chhagan Bhujbal, Ajit Pawar
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी फडणवीस सरकारचा पहिल्याच अधिवेशनात मोठा निर्णय, लवकरच पैसे मिळणार

त्यामुळे छगन भुजबळ ही गोष्ट समजून घेतील, असं मला वाटतं. मुनगंटीवारांनी ही गोष्ट समजून घेतली आहे. कारण शेवटी पक्षांतर्गत होणारे निर्णय मान्य करून आपल्याला पुढे जावं लागतं. हे दोन्ही नेते समजून घेतील आणि पुढे जात राहतील, असं मला वाटतं."

बावनकुळे यांनी नाराज नेत्यांबाबत प्रतिक्रिया दिली असली तरीही मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळांनी थेट अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहे. माध्यमांशी बोलताना भुजबळांनी आपणाला शब्द देऊन डावललं असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे. तसंच ते कालच नागपुरातील अधिवेशन सोडून थेट नाशिक गाठलं होतं. छगन भुजबळ यांची ओबीसी नेता म्हणून राज्यभरात ओळख आहे.

Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar, Chhagan Bhujbal, Ajit Pawar
Chhagan Bhujbal : नाराज छगन भुजबळांची 'या' मोठ्या पदावर वर्णी लागणार, भाजप नेत्याचा दावा

त्यांना मंत्रि‍पदापासून वंचित ठेवल्यामुळे राज्यभरात आक्रमक ओबीसी संघटनाकडून आंदोलन करत महायुतीचा निषेध केला जात आहे. काही ठिकाणी तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या मंत्र्यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान महायुती सरकार समोर निर्माण झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com