BJP vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे-भाजप युती कागदावर, रणांगणात संघर्ष! कल्याण डोंबिवलीत 9 ठिकाणी बंडखोरी

Kalyan-Dombivli Municipal Elections : कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेत युती झाली आहे. मात्र ही युती कागदावरच राहणार की प्रत्यक्ष मैदानात दिसणार याची चर्चा सुरू झाली आहे.
Ravindra Chavan VS Eknath Shinde Shivsena
Ravindra Chavan VS Eknath Shinde Shivsena Sarkarnama
Published on
Updated on

Kalyan-Dombivli News : कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये युती आहे. जागा वाटप देखील झाले आहे. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना ही युती फक्त कागदावरच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण तब्बल नऊ प्रभागांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार एकमेकांविरोधात रिंगणात उतरल्याने ‘युतीधर्म’ हा केवळ घोषणांपुरताच मर्यादित राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने कोण माघार घेणार यावर काथ्याकूट सुरू आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी युती होणार की नाही, याबाबत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती. स्थानिक पातळीवर भाजपमधील अनेक पदाधिकारी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. मात्र दिल्लीतील आदेशामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यापुढे युतीचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. तरीही शेवटपर्यंत युतीची ठोस घोषणा न झाल्याने संभ्रमाचे वातावरण कायम राहिले.

अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात अनेक इच्छुकांच्या हाती एबी फॉर्म न पडल्याने अस्वस्थता वाढली. तर काही ठिकाणी भाजपकडून एबी फॉर्म वाटप सुरू असतानाच शिवसेनेने ठरलेल्या जागावाटपाला छेद देत काही प्रभागांमध्ये ‘एबी’ फाॅर्म दिल्याचे समजताच भाजपनेही त्याला तोडीस तोड उत्तर दिले.

Ravindra Chavan VS Eknath Shinde Shivsena
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ बरे झाले, ह्रदय शस्त्रक्रियेनंतर प्रथमच नाशिकमध्ये येणार; येताच करणार 'हे' पहिले महत्वाचे काम

शिवसेनेच्या प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याने थेट सामना अटळ ठरला. परिणामी नऊ प्रभागांमध्ये महायुतीचे उमेदवारच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

या प्रभागांमध्ये आमने सामने

पॅनल क्र. 1 - ब मध्ये शिवसेनेच्या सुप्रिया भोईर विरुद्ध भाजपच्या स्मृती पाटील,

पॅनल 7 - अ मध्ये शिवसेनेच्या विजया पोटे विरुद्ध भाजपच्या वैजयंती पाटील,

पॅनल 7 - ड मध्ये शिवसेनेचे मोहन उगले विरुद्ध भाजपचे डॉ. पंकज उपाध्याय,

पॅनल 9 - ड मध्ये शिवसेनेचे प्रतीक पेणकर विरुद्ध भाजपचे नरेंद्र पुरोहित

पॅनल 21 - अ मध्ये भाजपचे प्रदीप जोशी विरुद्ध शिवसेनेचे जनार्दन म्हात्रे अशी थेट लढत आहे.

पॅनल 29 - अ मध्ये शिवसेनेच्या रुपाली म्हात्रे विरुद्ध भाजपच्या कविता म्हात्रे

पॅनल 29 - ब मध्ये शिवसेने च्या रंजना पाटील विरुद्ध भाजपाच्या आर्या नाटेकर

पॅनल 29 - क मध्ये भाजपाचे मंदार टावरे विरुद्ध शिवसेनेचे नितीन पाटील

पॅनल 29 - ड मध्ये शिवसेनेचे रविंद्र पाटील विरुद्ध भाजपच्या अलका म्हात्रे

माघार कोण घेणार?

उद्या (गुरुवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने वरिष्ठ नेते हस्तक्षेप करून बंडखोरी आवरतात की स्थानिक नाराजांना मोकळे रान देताय, हे स्पष्ट होणार आहे. युती कागदावर टिकते की मतदारांसमोर उघडपणे तुटते, याचा फैसला पुढील 24 तासांतच होणार आहे.

Ravindra Chavan VS Eknath Shinde Shivsena
NCP Ajit Pawar : भाजप, शिवसेनेपाठोपाठ अजितदादांच्या राष्ट्रवादीनेही बाजी मारली; 'या' महापालिकेत पहिला उमेदवार बिनविरोध

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com