BJP Vs Shivsena : बोर्ड फाडले, लाथा घातल्या, कानाखाली मारल्या... वरळीच्या 5 स्टार हॉटेलमध्ये भाजप-ठाकरेंच्या सेनेत तुफान राडा

BJP Vs Shivsena : मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने येत मोठा राडा झाला. कामगार संघटना वादातून हा तणाव निर्माण झाला होता.
Police intervene during BJP vs Shiv Sena (UBT) clash in Mumbai.
Police intervene during BJP vs Shiv Sena (UBT) clash in Mumbai.Sarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Shivsena : मुंबईमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तुफान राडा झाला. वरळीतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांचे हजारो कार्यकर्ते आमने-सामने आले होते. कामगार युनियनवरून हा वाद झाल्याची माहिती आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तिथले पक्षांचे कामगार युनियनचे बोर्ड फाडले, एकमेकांना लाथा घातल्या, कानाखाली मारल्या. भाजप नियमबाह्यरित्या संघटनेची नोंद करत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते विरोधात उतरले होते. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूंच्या आक्रमक कार्यकर्त्यांवर ताबा मिळवला.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्येही भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असाच राडा झाला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना भाजप प्रणित अखिल भारतीय कर्मचारी संघटनेत सहभागी होण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाकडून दबाव येत असल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केले होते. आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात शिवसेनेने हॉटेलबाहेर आंदोलन केले होते.

त्यानंतर अशाच प्रकारे सेंट रेजिस हॉटेलमध्येही याच कारणावरून राडा झाल्याची माहिती आहे. मुंबईमधील अनेक पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित भारतीय कामगार सेना कार्यरत आहे. अशात काही दिवसांपूर्वी भाजप प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेची स्थापना झाली आहे. या संघटनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित संघटनेतील कामगारांची दिशाभूल करून त्यांच्या सह्या घेऊन संघटनेत सहभागी होण्याबाबत हॉटेल प्रशासनाकडून दबाव येतो, असा आरोप होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com