Sanjay Raut : 'इतक्या' मतांनी हरणार होती भाजप, संजय राऊतांनी थेट आकडाच सांगितला

Sanjay Raut | गुप्त सर्वेत भाजपला पराभवाची भनक लागली होता.
Sanjay Raut,  Devendra Fadnavis    Latest news
Sanjay Raut, Devendra Fadnavis Latest news Sarkarnama
Published on
Updated on

Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली. अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर भाजपने उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरुन भाजपवर (BJP) निशाणा साधला. इतकंच नव्हे तर भाजप या निवडणुकीत किती मतांनी हरणार होती हा आकाडाही त्यांनी सांगितला.

अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीत भाजपवर माघार घेण्याची नामुष्की ओढावली. पण अंधेरीचा निकाल आमच्याच बाजूने लागणार याची खात्री होती. या निवडणूकीत भाजपचा 40 हजार मतांनी पराभव होणार होता. त्यामुळे त्यांनी माघार घेतली, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. याचवेळी त्यांनी न्यायालयाच्या आवरात पत्रकारांशी संवाद साधला.

Sanjay Raut,  Devendra Fadnavis    Latest news
Gram Panchayat Election Result : बड्या पक्षांना धूळ चारत भणंग ग्रामपंचायतीत अपक्ष उमेदवार विजयी

राज ठाकरे यांच पत्र म्हणजे भाजपची स्क्रिप्ट होती, या निवडणुकीसाठी भाजपने एक गुप्त सर्वे केला होता. या सर्वेत आपली हार होणार याची भनक भाजपला लागली होती. म्हणून राज ठाकरे यांना पुढे करण्यात आलं. म्हणून राज ठाकरे यांना पत्र लिहायला सांगण्यात आले. हरण्याची भनक लागल्यामुळेच भाजपने राज ठाकरेंना पुढे केलं आणि त्यांना पत्र लिहीयला सांगितलं

दरम्यान, अंधेरी पूर्वच्या या पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत होत्या. भाजपकडून मुरजी पटेल आणि ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दरम्यान राजकारणात बरेच ट्विस्टही आले. ऋतुजा लटके यांच्या राजीनामा महापालिकेकडून मंजूर कण्यात अडचणी येत होत्या. शेवटी ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांचा राजीमाना मंजूर करण्यात आला. त्यानंतरही लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप करण्यात आले. पण काल राज ठाकरे, शदर पवार आणि प्रताप सरनाईक यांच्या आवाहनानंतर भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली आणि ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com