BJP Vs Shivsena: उद्या देशभरात लोकसभेच्या निकाल लागणार आहे. सगळ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. तर महायुतीतील मित्रपक्ष मिळून निकालाचा आनंद साजरा करतील यात शंका नाही. परंतु, निकालापूर्वीच युतीतील टोकाचा वाद आला आहे. उल्हासनगरमध्ये महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिंदे गट आणि भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. विकासकामाच्या श्रेय वादातून झालेल्या या भांडणात भाजपच्या कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे.
उल्हासनगर (Ulhasnagar) येथील मराठा सेक्शन भागात स्थानिक नगरसेवक मिताली सोनू चांनपुर यांच्या प्रयत्नाने एक विकास काम सुरू आहे. या कामाचे श्रेय घेण्यासाठी स्थानिक भाजप कार्यकर्ते सुनील तांबेकर आणि त्यांचे बंधू संतोष तांबेकर हे आले होते. मात्र तांबेकर यांचा या विकासकामाशी कोणताही संबंध नसून ते फक्त कामामध्ये श्रेय घेत आहेत. असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि यातून जोरदार भांडणाला सुरुवात झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी शिंदे गटाचे माजी युवा पदाधिकारी सोनू चांनपुर यांच्याकडे काम करत असलेल्या निलेश सरोजा यांनी संतोष तांबेकर यांना फ्री स्टाईल बेदम मारहाण केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर संतोष तांबेकर यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
तर निलेश सरोजा यांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवार सायंकाळची असून याप्रकरणी तांबेकर यांची प्रतिक्रिया भेटली नसली तरी शिंदे गटाचे युवा सेना माजी पदाधिकारी सोनू चांनपुर यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निकालाच्या धामधुमीच्या काळात शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या भांडणाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.