सत्तांतरानंतर भाजपचं पहिलं सेलिब्रेशन पनवेलमध्ये...

Devendra Fadnavis|Shivsena|Chandrakant Patil : बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे भाजपा-शिवसेना सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतील.
Devendra Fadnavis-chandrakant Patil Latest News
Devendra Fadnavis-chandrakant Patil Latest News Sarkarnama
Published on
Updated on

मुंब्ई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक उलथापलथ बघायला मिळाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळलं आणि शिवसेनेसोबत बंडखोरी केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबतच्या सुमारे 40 बंडखोर आमदारांच्या साथीने भाजपने (BJP) राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यामुळे भाजप नेत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत आहे.

दरम्यान, सत्तांतरानंतर आणि राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्यात मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवारी (ता.२३ जुलै) रोजी पनवेल येथे होणार आहे. यामुळे भाजपच पहिलंच सेलिब्रेशन पनवेलमध्ये बघायला मिळणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे प्रमुख मार्गदर्शन असेल, अशी माहिती भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी दिली आहे. (Devendra Fadnavis-chandrakant Patil Latest News)

Devendra Fadnavis-chandrakant Patil Latest News
..म्हणून त्यांच्या पोटात दुखतयं; आदित्य ठाकरेंनी केली बंडखोरांची पोलखोल

केशव उपाध्ये म्हणाले की, या बैठकीस भाजपा प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, आमदार, जिल्हाध्यक्ष, विविध मोर्चा आघाड्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य, असे सुमारे आठशे प्रतिनिधी उपस्थित राहतील. बैठकीचे उद्घाटन प्रदेशाध्यक्षांच्या संबोधनाने होईल तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने बैठकीचा समारोप होईल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार राजकीय प्रस्ताव मांडणार असून ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळविल्याबद्दल प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे भाजपा-शिवसेना सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतील. शेतीविषयक प्रस्ताव भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे मांडतील. दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत राजकीय सद्य स्थितीबद्दल चर्चा होणार असून आगामी कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Devendra Fadnavis-chandrakant Patil Latest News
यापुढे गद्दारांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल; माजी खासदाराचा थेट इशारा...

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर आणि शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची ही पहिलीचं बैठक मुंबई परिसरात होणार आहे. राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीत यश मिळवल्यानंतर तथा राज्यात सत्तांतर झाल्याच सेलिब्रेशन भाजपला खुलेपणाने करता आला नव्हते. यामुळे या निमित्ताने हे सेलिब्रेशन केलं जाणार हे नक्की. त्यातच आता आगामी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्यात महत्वाची आणि प्रतिष्ठेच्या असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. यामध्ये पक्षाची पुढील वाटचाल कशी असेल याबाबत चर्चा होऊ शकते. यामुळे या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com