Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेला महाराष्ट्रात सपाटून मार खाल्लेल्या भाजपने आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आगामी विधानसभेसाठी भाजपचं मिशन 125 असून राज्यातील 50 जागा भाजपने (BJP) निश्चित केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
या 50 जागांवर भाजपचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. मात्र, इतर 75 जागांवरील उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. तसेच या जागा निवडून आणण्याची राज्यातील बड्या नेत्यांवर देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
यासाठी प्रत्येक बड्या नेत्यावर विधानसभेचे 7-8 मतदार संघाची जबाबदारी देण्याचं नियोजन असून या नेत्यांनी आपला अहवाल वरिष्ठ नेतृत्त्वाकडे द्यायचा आहे. शिवाय आतापासून भाजपचे (BJP) नेते मिशन 125 साठी कामाला लागल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता भाजपचं हे मिशन कितपत यशस्वी होणार हे निवडणुकांनंतरच कळेल.
मात्र, राज्यात सध्या भाजपसाठी पूरक वातावरण नसल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, त्यांनी टार्गेट भाजप नेत्यांना आणि खास करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केलं आहे. तर दुसरीकडे अजितदादांना महायुतीत घेतल्यामुळे अनेक भाजप नेते, पदाधिकारी नाराज आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि भाजपच्याच स्थानिक नेत्यांचं पटत नसल्याचं चित्र आहे.
अशातच अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असणाऱ्या मतदारसंघातील अनेक भाजप नेत्यांनी आतापासून तुतारी हातात घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे हे चित्र असंच राहिलं तर विधानसभेला भाजपची मोठ्या प्रमाणात गोची होऊ शकते. मिशन कितीही जागांचं घोषित केलं तरीही, आता आहेत ते नेते भाजपमध्ये रहावेत यासाठी काहीतरी उपाययोजना करणं महत्वाचं ठरु शकतं, असंही बोललं जात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.