BJP & Shivsena Political News : भाजपच्या 'त्या' सर्व्हेनं शिंदे गटाची धाकधूक वाढवली, विद्यमान सात खासदारांचा पत्ता कट होणार ?

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकांना अद्याप एक वर्ष बाकी असतानाच भाजपाकडून शिवसेनेच्या मतदारसंघावर दावा ठोकण्यास सुरुवात केली आहे.
BJP & Shivsena Political News
BJP & Shivsena Political NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपसह शिंदे गटाने देखील लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. याचदरम्यान, लोकसभा निवडणुकांना अद्याप वर्षभराचा कालावधी बाकी असतानाच भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत मतभेद उफाळून समोर येत आहे. शिंदे गटाच्या अनेक मतदारसंघावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून दावा सांगण्यात येत होता. त्यातच आता विद्यमान 7 खासदारांचा आगामी निवडणुकीत पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षा(BJP) कडून काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे करण्यात आला होता. यात जर लोकसभा निवडणूक झाल्यास राज्यातून किती खासदार निवडून येतील यासंदर्भातील सर्व्हे करण्यात आला होता. भाजपकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांना मोठा फटका बसत असल्याची माहिती यातून उघड झाली आहे. त्यामुळे फटका बसत असलेल्या खासदारांना डच्चू देऊन त्याठिकाणी भाजप आपला उमेदवार उभा करण्याची चाचपणी पक्षांतर्गत सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

BJP & Shivsena Political News
Raver Loksabha Election: रक्षा खडसेंना लोकसभेचं तिकीट मिळणार की कापलं जाणार? गिरीश महाजनांनी दिलं उत्तर

राज्यात लोकसभे(Loksabha Election)च्या 48 जागा आहे. 2019 मध्ये भाजपने 23 जागेवर विजय मिळवला होता. शिवसेनेला 18 जागेवर विजय मिळवता आला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागेवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेस, एमआयएम आणि अपक्ष यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला होता. मात्र 2019 मध्ये आणि आताच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असून सध्या शिवसेनेचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे.

भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आलेला सर्वे भाजपच्या देखील विद्यमान खासदारांसंदर्भात आलेला सर्व्हे उत्तम कामगिरी न करणाऱ्या खासदारांना देखील डच्चू मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भातील अहवालाची प्रत केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यात आली असून यावर भाजपकडून काम सुरू झाले आहे. त्यामुळे उत्कृष्ट कामगिरी न करणाऱ्या खासदारांची नावे अद्याप बाहेर आली नसली तरी पाच ते सहा खासदार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

BJP & Shivsena Political News
Mohol Politic's : राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार धांदात खोटे बोलत आहेत; भाजप पदाधिकाऱ्याची खरमरीत टीका

शिवसेना- भाजपा युतीत खटके

शिवसेना(Shivsena) आणि भाजपामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवली मतदार संघावर देखील भाजपने आपला दावा सांगितला आहे. कल्याण डोंबिवली मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहे. यासह राज्यातील अनेक ठिकाणी भाजपने आपला दावा सांगितला आहे अशावेळी ज्या पक्षाचा उमेदवार अधिक प्रबळ असून विजयी होणाऱ्या उमेदवाराला ती जागा सोडण्यात येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेच्या जाहिरातींवरुन नाराजीनाट्य...

आगामी लोकसभा निवडणुकीला एक वर्ष अद्याप बाकी असतानाच आतापासूनच शिवसेना शिंदे गट आणि भाजपातील अंतर्गत मतभेद उफाळून समोर येत आहे. शिंदे गटातील अनेक मतदारसंघावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून दावा सांगण्यात येत होता. त्यात आता शिंदे गटाकडून वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे अशा स्वरूपाची जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले नव्हते. तसेच एकनाथ शिंदे पेक्षा कमी पसंती असल्याचे जाहिरात मध्ये म्हटले होते.

BJP & Shivsena Political News
Mohol Politic's : राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार धांदात खोटे बोलत आहेत; भाजप पदाधिकाऱ्याची खरमरीत टीका

त्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या दोन कार्यक्रमाला दांडी मारली होती. ही नाराजी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटासाठी कळीचा मुद्दा ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार

कृपाल बालाजी तामणे (रामटेक), भावना पुंडलिकराव गवळी (यवतमाळ-वाशीम), हेमंत पाटील (हिंगोली), संजय हरिभाऊ जाधव (परभणी), हेमंत तुकाराम गोडसे (नाशिक), राजेंद्र ढेड्या गावित (पालघर), डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (कल्याण), गजानन कीर्तिकर (मुंबई उत्तर पश्चिम), राहुल शेवाळे (मुंबई दक्षिण मध्य), श्रीरंग अप्पा चंदू बारने (मावळ),

सदाशिव किसन लोखंडे (शिर्डी), संजय सदाशिवराव मंडलिक (कोल्हापूर), धैर्यशील संभाजीराव माने (हातकणंगले).

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.