BKC cycling track: आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर महायुती सरकार हातोडा टाकणार ; कोट्यवधी रुपयांचे नुकसान

Aaditya Thackeray BKC Cycling Track Project Removal By MMRDA: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रियाही सुरू केली आहे.
 BKC Cycling Track Project Removal By MMRDA
BKC Cycling Track Project Removal By MMRDASarkarnama
Published on
Updated on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर महायुती सरकार हातोडा टाकणार आहेत. आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सायकल ट्रक एमएमआरडीए उखडणार आहे. हा सायकल ट्रक तोडण्यासाठी 25 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आहे. वाहतूक कोडी सोडवण्यासाठी सायकल ट्रक उखडण्यासाठी एमएमआरडीए कंत्राटदार नेमणार आहे.

सायकल ट्रॅक उभारण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मंत्री असताना पुढाकार घेतला होता. वांद्रे कुर्ला संकुल परिसरात (बीकेसी)वाहतुकी समस्या वाढली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी एमएमआरडीए हे पाऊल उचलेले आहे. सायन पूल सध्या बंद असल्याचे बहुतांश वाहतूक वांद्रे कुर्ला संकुल परिसराकडून एकेरी वळवण्यात आली आहे.

वांद्रे कुर्ला संकुल परिसरात कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले तब्बल ९.९० किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक आता उखडून टाकण्यात येणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रियाही सुरू केली आहे. हा सायकल ट्रक करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता आणि आता तो उखडण्यासाठीही कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

 BKC Cycling Track Project Removal By MMRDA
Manoj Naravane: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्या हल्ल्यानंतर 'अभी पिक्चर बाकी है' म्हणणारे मनोज नरवणे आता काय म्हणाले?

सायकल ट्रॅक उखडून टाकल्याने सध्याच्या २ मार्गिकांमध्ये आणखी एका मार्गिकेचा तयार करण्यात येणार आहे. यामुळे रस्ता रुंदीकरणात सुमारे ५० टक्के वाढ होणार असल्याचे एमएमआरडीएचे म्हणणं आहे. प्रत्येक मार्गिकेची वाहतूक क्षमता ६०० ते ९०० वाहनांनी वाढण्याची अपेक्षा एमएमआरडीएचे अधिकारी व्यक्त करत आहेत.

बीकेसी कनेक्टरच्या सुरुवातीलाही काही प्रमाणात कोंडीचा प्रश्न आहे. या परिस्थितीतच सायन पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने ती वाहतूकही आता बीकेसीतून वळविली जाते आहे. वांद्रे-कुर्ला लिंक रोडवर कलानगर जंक्शनपासून भारत डायमंड बोर्सपर्यंत कायम वाहतूक कोंडीचा सामना सध्या करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. बीकेसीत कामानिमित्त दररोज येणाऱ्यांची संख्या सुमारे ६ लाख आहे. त्यामुळे याठिकाणी गर्दीच्या वेळेत येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते.

गर्दीच्या वेळेतील प्रवासाचा कालावधी २५ मिनिटांवरून १५ मिनिटांपर्यंत कमी होईल, तर सिग्नल किंवा अरुंद जागांवर प्रतीक्षा वेळ १० मिनिटांवरून ७ मिनिटांपर्यंत कमी होईल. त्यातून कार्बन उत्सर्जनदेखील ३० टक्क्यांनी कमी होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com