BMC Election News: भाजपचं ठरलं ! मुंबई महापालिकेसाठी १३८ जागांवर मराठी चेहऱ्यांना संधी

Brihanmumbai Municipal Corporation Election: निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
BMC Maha Nagarpalika
BMC Maha Nagarpalika Sarkarnama
Published on
Updated on

BMC MahaNagarpalika Election: मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्याची रणनीती भाजपने आखली आहे. मुंबईत २८ टक्के मराठी मतदार आहेत, अशी माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. भाजप मुंबईत १३८ जागांवर मराठी चेहऱ्याना संधी देणार आहे. त्या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.

मुंबई पालिकेसाठी नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे, यात मुंबईतील २२७ पैकी १११ जागांवर भाजप, शिंदे गट, अजित पवार गट व त्यांच्या मित्र पक्षाचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गट व काँग्रेस, शरद पवार गट यांचे शंभर जागांवर उमेदवार विजयी होऊ शकतात, असे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

BMC Maha Nagarpalika
Ashish Shelar Slams Aaditya Thackeray: 'लबाड लांडगा ढोंग करतोय' ; श्वेतपत्रिकेवरून आदित्य ठाकरेंना शेलारांचा टोला

आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासोबतच ओबीसी आरक्षणाचा निकाल हा एक सप्टेंबरनंतर लागणार असे गृहीत धरून पालिका निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचे समजते. त्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. त्यासाठी भाजपचे आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे आतापासूनच कामाला लागले आहेत.

राज्यातील २८ महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका गेल्या दीड वर्षापासून रखडल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई व पुण्यातील पालिकेचा कालावधी मार्च २०२२ मध्येच संपलेला आहे. तर काही नगरपालिका व नगरपंचायतीचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२१ ला संपला आहे. त्यामुळे या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BMC Maha Nagarpalika
CM Eknath Shinde Talk Show: मुख्यमंत्री शिंदे करणार 'मन की बात' ; 'मी मुख्यमंत्री बोलतोय' मधून देणार जनतेच्या प्रश्नांची उत्तरे..

मुंबई महापालिकेत आगामी काळात आपला महापौर विराजमान व्हावा, यासाठी मुंबईत भाजपने दीडशे जागा जिंकण्याचा निर्धार केला होता. यासाठी भाजपचे अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार यांच्यासह त्यांची टीम कामाला लागली आहे. आज (शुक्रवारी) अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर भाजपकडून आगामी निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येणार आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com