BMC Election News : मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांसाठी आज काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांना अनेक वर्षांपासून राखलेले प्रभाग गमवावे लागले आहे. आरक्षणाचा सर्वच पक्षातील सुमारे 30 माजी नगरसेवकांना फटका बसला आहे. त्यांना बाजूचे प्रभाग शोधण्याशिवाय पर्याय नाही. तीन तीन टर्म निवडून आलेल्या माजी नगरसेवकांना आरक्षण बदलल्याचा फटका बसला आहे. या आरक्षणामुळे नव्या चेह-यांना संधी मिळणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार तब्बल तीन वर्षानंतर प्रभाग आरक्षणाची सोडत निघाल्याने राजकीय पक्ष निवडणूकीसाठी सज्ज झाले आहेत.
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढून प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले. यामध्ये एकूण 227 प्रभागातील 114 प्रभाग हे महिलांसाठी राखीव असतील. तर अनुसूचित जमातीसाठी अनुसुचित जातींसाठी एकूण 15 प्रभाग राखीव आहेत. यामध्ये अनुसुचित जातीच्या महिलांसाठी 8 प्रभाग आरक्षित, अनुसुचित जमातीसाठी दोन प्रभाग राखीव असून त्यापैकी एका ठिकाणी महिला उमेदवारासाठी आरक्षण आहे.
अनुसुचीत जातींसाठी मुंबईतील ६१ वॉर्ड राखीव ठेवण्यात आले, यामध्ये 31 महिला अनुसुचित जाती महिलांसाठी आरक्षित आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 61 प्रभाग राखीव आहेत. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या 31 प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. उमेदवारांचा समावेश असणार आहे.
मुंबई महानगरपालिकेतील एकूण 227 प्रभागांची सोडत काढ काढण्यात आली. त्यात महिलांसाठी राखीव-114, अनुसुचित जातींसाठी राखीव वॉर्ड- 15 त्यात महिलांसाठी 8, अनुसुचित जमाती एकूण राखीव -2 महिलांसाठी १, ओबीसी राखीव 61 त्यात महिलांसाठी 31 तर सर्वसाधारण प्रभागासाठी 149 त्यात महिलांसाठी राखीव 74 प्रभाग आरक्षित झाले आहे. अनुसुचित जातींसाठी 15 प्रभाग आरक्षित असून त्यापैकी आठ प्रभाग स्त्रीयासाठी आरक्षित आहेत.
तब्बल तीन वर्ष रखडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी आज एकूण 227 प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीचा पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपाचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर, शिवसेना (शिंदे) पक्षाचे यशवंत जाधव, मंगेश सातमकर, शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाच्या माजी महापौर विशाखा राऊत, माजी महापौर स्नेहल आंबेकर, माजी महापौर मिलिंद वैद्य, आशिष चेंबूरकर आदी सुमारे तीस माजी नगरसेवकांना आरक्षणांचा फटका बसला आहे. या सोडतीने काही नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.
किशोरी पेडणेकर, उज्ज्वला मोडक, शीतल म्हात्रे, सचिन पडवळ, संजय घाडी, सुहास वाडकर, राजूल पटेल, मेहर हैदर मोहसिन, अलका केरकर, प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे, राखी जाधव, गीता गवळी, हेमांगी वरळीकर, आकाश पुरोहित, सहिदा खान, अमेय घोले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.