
BMC Homes : मुंबईत म्हाडाच्या घरांची सोडत कधी निघते याची वाट पाहणाऱ्या मुंबईकारांसाठी मुंबई महापालिकेच्यावतीनं उभारण्यात येणाऱ्या घरांची लॉटरी लवकरच निघणार आहे. यासाठी उद्यापासून अर्थात १६ ऑक्टोबरपासून सदनिका विक्रीला प्रारंभ होणार आहे. यासाठी इच्छुकांना महापालिकेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. पण कधीपर्यंत अर्ज करता येतील, त्याचे डिटेल्स काय आहेत? जाणून घ्या.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू होत असून, ही मुंबईकरांसाठी खास दिवाळीची भेट ठरणार आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०)(ब) अन्वये प्राप्त ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी महापालिकेकडून १६ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. नागरिकांना https://bmchomes.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येतील. अर्ज १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून उपलब्ध होतील, तर अंतिम सोडत २० नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल.
पात्र अर्जदारांची यादी आणि सोडतीचे निकाल अनुक्रमे १८ आणि २१ नोव्हेंबर रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील. घरांच्या सोडतीसंदर्भात माहिती व मदतीसाठी ०२२-२२७५४५५३ या क्रमांकावर किंवा bmchomes@mcgm.gov.in या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.