Hindi Ban Act: तामिळनाडूत आता हिंदी भाषेतील होर्डिंग्ज, सिनेमे, गाण्यांवरही कायद्यानं येणार बंदी? सरकार आणणार नवं विधेयक

Hindi Ban Act: केंद्र सरकारकडून देशभरात हिंदी भाषा ही कारभाराची प्रमुख भाषा करण्याचा घाट घातला जात आहे. पण अनेकविध भाषांनी समृद्ध असलेल्या भारतात सरकारच्या या अजेंड्याला महाराष्ट्रासह दक्षिणेतील सर्वच राज्यांचा कडाडून विरोध आहे.
M k stalin takes oath as tamilnadu chief minister
M k stalin takes oath as tamilnadu chief minister
Published on
Updated on

Hindi Ban Act: केंद्र सरकारकडून देशभरात हिंदी भाषा ही कारभाराची प्रमुख भाषा करण्याचा घाट घातला जात आहे. पण अनेकविध भाषांनी समृद्ध असलेल्या भारतात सरकारच्या या अजेंड्याला महाराष्ट्रासह दक्षिणेतील सर्वच राज्यांचा कडाडून विरोध आहे. विशेषतः तामिळनाडू राज्य किंवा तिथलं स्टॅलिन यांचं सरकारनं आपल्या कडव्या भाषिक भूमिकेत वारंवार जाताना दिसत आहे. त्यानुसारच आता तामिळनाडू सरकारनं हिंदी होर्डिंग्ज, सिनेमे आणि गाण्यांवर बंदी घालण्याबाबतचं विधेयकचं विधानसभेत मांडण्याची तयारी सुरु केली असल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. इंडिया टुडेनं याबाबत बातमी दिली आहे.

M k stalin takes oath as tamilnadu chief minister
Bihar Election 2025: बिहारमध्ये भाजपची मोठी खेळी! 10 विद्यमानसह माजी आमदारांना दाखवला घरचा रस्ता; कारण जाणून घ्या

या वृत्तानुसार, हिंदी होर्डिंग्ज, बोर्ड, चित्रपट आणि गाण्यांवर बंदी घालणारे विधेयक आजच तामिळनाडूच्या विधानसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. संविधानाचं चांगल्या प्रकारे पालन करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय काम करेल असं तामिळनाडूतील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पण भाजपनं याला हास्यास्पद आणि राजकीय भूमिका असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, प्रस्तावित कायद्यावर चर्चा करण्यासाठी काल रात्री कायदेतज्ज्ञांसोबत एक आपत्कालीन बैठक आयोजित करण्यात आली होती.

M k stalin takes oath as tamilnadu chief minister
Mumbai ST Bank : मुंबई एसटी बँकेत तुफान राडा, सदावर्ते अन् एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत हाणामारी; नेमकं काय घडलं ?

सूत्रांच्या माहितीनुसार, हे विधेयक संपूर्ण तामिळनाडूमध्ये हिंदी होर्डिंग्ज, बोर्ड, चित्रपट आणि गाण्यांवर बंदी घालण्यासाठी असणार आहे. द्रमुकचे ज्येष्ठ नेते टीकेएस एलांगोवन यांनी विधेयकावर भाष्य करताना म्हटलं की, "आम्ही संविधानाविरुद्ध काहीही करणार नाही, आम्ही त्याचे पालन करू. आम्ही हिंदी लादण्याच्या विरोधात आहोत"

M k stalin takes oath as tamilnadu chief minister
CM Fadnavis statement : विरोधी पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेताच सीएम फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले, 'विरोधकांनी कायदा व्यवस्थित समजून घ्यावा'

तथापि, भाजपचे विनोज सेल्वम यांनी या निर्णयाला 'मूर्ख आणि हास्यास्पद' म्हटलं आहे. भाषेचा वापर तामिळनाडू सरकारनं राजकीय हत्यार म्हणून करू नये, असंही भाजपनं म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, "तिरुपरंकुंद्रम, करूर चौकशी आणि आर्मस्ट्राँग प्रकरणांसह अलिकडच्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये अपयशाचा सामना करत असलेला सत्ताधारी द्रमुक पक्ष हा वादग्रस्त फॉक्सकॉन गुंतवणूक प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाषेच्या वादाचा वापर करत असल्याचं दिसून येतं आहे.

M k stalin takes oath as tamilnadu chief minister
India’s First NFC Payment Ring : वॉलेट आणि फोनला म्हणा 'बाय-बाय'! आता एका सोन्याच्या अंगठीने करा पेमेंट

या वर्षी मार्चमध्ये, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या सरकारनं २०२५-२६ च्या राज्य अर्थसंकल्पाच्या लोगोमध्ये राष्ट्रीय रुपया चिन्हाऐवजी तमिळ अक्षर (ru) असं लिहिलं होतं. या बदलामुळं भाजप नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी टीका केली होती. पण यावर द्रमुकनं आपण राष्ट्रीय चिन्ह नाकारण्याऐवजी तमिळ भाषेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दांत बचाव केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com