Expenses on PM's Mumbai Visit: स्टेजपासून कार्पेटपर्यंत, पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर आठ कोटींचा खर्च: BMC ने यादीच दिली

Maharashtra Politics : मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून हा खर्च कऱण्यात आला आहे
Expenses on PM's Mumbai Visit:
Expenses on PM's Mumbai Visit: Sarkarnama
Published on
Updated on

Expenses on PM's Mumbai Visit: या वर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्या मुंबई दौऱ्यावर मुंबई महापालिकेने तब्बल ८ कोटी रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पैसे स्टेज कन्स्ट्रक्शन, चेअर, सोफा, सजावट, प्रकाश, सॉड, फुलांची सजावट यासह एकूण 89 कामांवर खर्च तब्बल आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Expenses on PM's Mumbai Visit:
Maharashtra Govt : फडणवीस 'सुपर सीएम’ टीकेला शिंदेंनी दिलं उत्तर ; 11 महिन्यात शिंदेंची सरशी

हा कार्यक्रम एमएमआरडीएने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयोजित केला होता. परंतु कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च मुंबई महापालिकेच्या तिजोरीतूनच कऱण्यात आला होता. त्यावेळीही विरोधी पक्षाने बीएमसी'ने केलेल्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले होते. प्रोटोकॉल अंतर्गत असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राज्य सरकार जबाबदार आहे, असल्याचंही विरोधी पक्षांनी म्हटले आहे. (Maharashtra Politics)

पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी एकूण 89 प्रकारची कामे केली गेली. या दौर्‍यामध्ये कोणतीही कमतरता नाही, यासाठी बीएमसीने खुलेपणाने पैसे खर्च केले.पंतप्रधानांचा कार्यक्रमासाठी बीएमसीच्या तीन विभागांमधून हा खर्च करण्यात आला आहे. एसडब्ल्यूडी, फेरीवाला आणि आरोग्य विभाग समाविष्ट आहे.

Expenses on PM's Mumbai Visit:
Raj Thackeray On Ajit Pawar: '' अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत, पण मी...''; राज ठाकरेंचा खोचक टोला

या गोष्टींवर केला खर्च

- 3 दिवसांसाठी 75 हजार खुर्ची - 66,66,750

- रेड कार्पेटसह स्टेज - 5,47,585

- व्हीव्हीआयपीसाठी डायस- 1,54,867

- थेट संगीतासाठी स्टेज- 2,90,376

- साइड विंग एलईडी स्क्रीन वॉल - 3,92,532

- व्हीव्हीआयपी एंट्रीच्या दोन्ही बाजूंनी एलईडी भिंत- 11,44,886

- डायस फर्निचर - 98,766

- टॉवर एसी - 237038

- कार्पेट आणि रांगोलीसह डी झोन ​​ब्रँडिंग - 6,17,287

- फ्लॉवर सजावट व्यासपीठ आणि व्हीव्हीआयपी प्रवेशद्वार- 9,72,845

- पारंपारिक स्वागत, ढोल -टासा आणि रणशिंग - 2,96,298

- व्हीआयपी क्षेत्रासाठी रेड कार्पेटसह वोलन प्लॅटफॉर्म - 3,18,3036

- व्हीआयपीसाठी 750 पलंग- 32,59,275

- पीए साऊंड सिस्टम- 44,44,470

- कॅफेटेरियासह व्हीआयपी लाऊंज - 2,71,606 (सर्व खर्च रु.)

असे होते पंतप्रधानांचे कार्यक्रम

मुंबई दौऱ्यात पंतप्रधानांनी मुंबई मेट्रो रेल्वे लाइन 2 ए आणि 7 चे उद्घाटन केले. तसेच, बीएमसीच्या (BMC) सात एसटीपी प्रकल्पांचा पाया, भांडुप, सिद्धार्थनगर आणि ओशिवारा हॉस्पिटलच्या पुनर्विकासाचा पाया, मुंबईतील ४०० कि.मी. रस्त्यांच्ये सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या योजनेचे भूमीपूजन, सीएसएमटीच्या पुनर्विकास प्रकल्पांचे अनावरण आणि पंतप्रधान सेल्फ -रिलीजियस योजनेंतर्गत एक लाखाहून अधिक फेरीवाल्यांच्या कर्जाचे हस्तांतरणही कार्यक्रम, या आणि अशा अनेक कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. याच कार्यक्रमांसाठीचा खर्च आठ कोटींच्या घरात गेला असून हा सर्व खर्च मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून कऱण्यात आला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com