Kirit Somaiya : सोमय्या पिता-पुत्राच्या अडचणी वाढल्या; 'INS' विक्रांतप्रकरणी न्यायालयाचा मोठा आदेश

Kirit Somaiya INS Vikrant in trouble in fund scam : भारतीय नौदलाची आयएनएस विक्रांत भंगारात जाण्यापासून रोखण्यासाठी नागरिकांकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता. 57 कोटींच्या निधीच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयाने नव्याने आदेश दिला आहे.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील यांच्या आयएनएस विक्रांत युद्धनौका प्रकरणी अडचणी वाढल्या आहेत. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेला 'क्लोजर रिपोर्ट' फेटाळला आहे.

मुंबई पोलिसांनी तपास केलाच नाही. अधिकचा तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. पी. शिंदे यांनी दिला आहे.

भारतीय नौदलाची आयएनएस विक्रांत ही विमानवाहून युद्धनौका भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि तिचे संग्रहालयात रुपांतर होण्यासाठी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी नागरिकांना आवाहन करत निधी गोळा केला होता. आयएनएस विक्रांतसाठी सुमारे 57 कोटींच्या निधीचा हा घोटाळा किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील यांनी केल्याचा आरोप करत सेवानिवृत्त कर्मचारी बबन भोसले यांनी तक्रार दाखल केली होती. सोमय्या पिता-पुत्राविरोधात 6 एप्रिल 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता.

Kirit Somaiya
Vidhansabha Election1962 Flashback: संयुक्त महाराष्ट्रानंतरची पहिलीच निवडणूक, काँग्रेस सत्तेत

किरीट सोमय्यांनी त्यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध घोटाळ्यांवर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्याचवेळी त्यांच्याशी संबंधित आयएनएस विक्रांतप्रकरण पुढे आल्याने बराच राजकीय गदारोळ झाला. या गुन्ह्याचा तपास मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने करत न्यायालयात 'क्लोजर रिपोर्ट' सादर केला होता. तक्रारदाराने गैरसमजुतीने तक्रार दाखल केली, असा अजब दावा मुंबई पोलिसांच्या (Police) आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये केला.

Kirit Somaiya
Assembly Election 2024 : मोठी बातमी! दिवाळीनंतर विधानसभेचे फटाके फुटणार?

मुंबई पोलिसांचा तपासाचा 'क्लोजर रिपोर्ट' अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. पी. शिंदे यांनी फेटाळला. हा घोटाळा नसल्याचा पोलिसांचा दावा असेल, तर मग सोमय्या पिता-पुत्राने गोळा केलेले पैसे कुठे? ते पैसे राज्यपालांचे कार्यालय किंवा सरकारकडे जमा केल्याचा एकही पुरावा पोलिसांनी का सादर केला नाही? असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले. याचा अर्थ मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास केला नाही, असे निरीक्षण नोंदवून तपास अधिकाऱ्यांना अधिक तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com