
धनंजय मुंडेंना न्यायालयाकडून दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाने कृषी साहित्य खरेदी व वितरण निर्णय वैध ठरवत मुंडेंवरील 245 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना फेटाळलं.
याचिका बनावट ठरली: खोटी व बिनबुडाच्या तक्रारीद्वारे न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल याचिकाकर्ता तुषार पडगिलवार यांच्यावर 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
सरकारच्या खरेदी प्रक्रियेला मान्यता: न्यायालयाने सरकारच्या थेट खरेदी निर्णयाला पारदर्शक ठरवून, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचं म्हटलं.
Mumbai News : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली होतीतब्बल 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुंडे यांच्यावर कृषीमंत्री असताना सुमारे 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर पण आता मुंबई उच्च न्यायालयानं धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) दिलासा देणारा मोठा निर्णय दिला आहे. (In a big relief, the Bombay High Court has given a clean chit to NCP leader Dhananjay Munde in the alleged ₹245 crore agriculture department scam, terming the petition baseless and politically motivated)
मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंना दिलासा देतानाच कृषी साहित्याची खरेदी व वितरणाचा निर्णय वैध ठरवलं आहे. तसेच मुंडेंनी संबंधित कृषी क्षेत्राशी निगडित सर्वसाहित्य खरेदी प्रक्रिया राज्य मंत्रिमंडळाची रितसर मान्यता घेऊनच राबवल्याचं उच्च न्यायालयान म्हटलं आहे.
विशेष बाब म्हणजे या धनंजय मुंडेंविरोधात त्यांच्या कृषिमंत्री असतानाच्या काळात झालेल्या खरेदी वितरणाच्या निर्णयांवर दाखल करण्यात आलेली याचिका बनावट ठरवली आहे. ही याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्ते तुषार पडगिलवारवर यांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराध्ये व संदीप व्ही. मर्णे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान,न्यायालयानं धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागात करण्यात आलेल्या खरेदीत कोणताही नियमभंग झाल्याचं निदर्शनास आलं नसल्याचं स्पष्ट करत दोन्ही याचिका फेटाळून लावल्या.
याचवेळी न्यायालयानं याचिकाकर्ता तुषार पडगिलवार यांना खोटी आणि बिनबुडाच्या तक्रारीद्वारे न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल खडेबोल सुनावतानाच 1 लाखांचा दंडही ठोठावला. तसेच तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्णयाविरोधात आरोपांची राळ उठवून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत चुकीचे आरोप करण्यात आल्याचा निर्वाळाही मुंबई हायकोर्टानं यावेळी दिला.
राज्य सरकारनं गेल्या वर्षी 12 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व महाराष्ट्र स्टेट पॉवरलूम कॉर्पोरेशन यांच्याद्वारे नॅनो डीएपी,नॅनो युरिया,बॅटरीवरील स्प्रेयर, मेटाल्डिहाईड कीटकनाशक व कापूस साठवणीसाठी बॅग्स यांसारख्या पाच वस्तू शेतकऱ्यांना थेट खरेदी करून पुरवण्याचं नियोजन केले होते. याच निर्णयावरून मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता राज्य सरकारच्या थेट खरेदी प्रक्रिया पारदर्शक व शेतकऱ्यांना पूरक असल्याचं स्पष्ट झालं आहे. याचवेळी सरकारच्या कृषी उत्पन्नवाढीच्या विशेष कृती आराखड्याला न्यायालयीन मान्यता मिळाल्याची चर्चा आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात सुमारे 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत खळबळ उडाली होती. त्यांनी सरकारने राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी जी योजना सुरू केली होती. त्यात नियमांना धाब्यावर बसवून मुंडेंनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता.
राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत कापूस गोळा करण्याच्या बॅग, नॅनो युरिया, नॅनो डीओबी, फवारणी पंप अशा वस्तूंची खरेदी करण्यात आली. मात्र या वस्तूंची खरेदी बाजारभावापेक्षा महाग करण्यात आली असल्याचं त्यांचं म्हणणं होतं.
प्रश्न: धनंजय मुंडेंवर कोणत्या काळातील भ्रष्टाचाराचे आरोप होते?
उत्तर: कृषीमंत्री असताना सुमारे 245 कोटी रुपयांच्या खरेदीतील भ्रष्टाचाराचे आरोप होते.
प्रश्न: न्यायालयाचा निर्णय काय होता?
उत्तर: न्यायालयाने मुंडेंवरील सर्व आरोप फेटाळून खरेदी प्रक्रिया वैध ठरवली.
प्रश्न: याचिकाकर्त्यावर काय कारवाई झाली?
उत्तर: खोटी याचिका दाखल केल्यामुळे तुषार पडगिलवार यांच्यावर 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
प्रश्न: मुंडेंवर आरोप कोण-कोण करत होते?
उत्तर: भाजपा आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.