Rakhi Jadhav News : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेला न्यायालयाचा दणका ; भाजपच्या मंत्र्यांवर केला होता आरोप...

NCP News : महापालिकेच्या अधिकारात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
Rakhi Jadhav News
Rakhi Jadhav NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) माजी नगरसेविका राखी जाधव यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. घाटकोपरच्या आचार्य अत्रे मैदानात गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यास परवानगी द्या, अशी याचिका राखी जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

Rakhi Jadhav News
Chandrababu Naidu Arrested : मोठी बातमी : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

महापालिकेच्या अधिकारात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. आचार्य अत्रे मैदानात महापालिकाच कृत्रिम तलावाची व्यवस्था करणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. भाजपचे आमदार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सांगण्यावरून महापालिकेने तलाव बांधण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप राखी जाधव यांनी केला होता. त्या स्वत: त्याठिकाणी तलावाची व्यवस्था करणार होत्या.

Rakhi Jadhav News
Gopichand Padalkar News : पडळकर विखेंना म्हणाले, 'भंडाऱ्याला आशीर्वाद समजा' ; आंदोलकांनी त्याचा वापर...

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी राखी जाधव यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. यापूर्वी त्यांच्यावर विभागीय कार्याध्यक्षपदाची जबाबदारी होती.

त्यांच्यावर मुंबई विभागातील सर्व ६ जिल्ह्याच्या संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नरेंद्र राणे आणि राखी जाधव मुंबई विभागीय कार्याध्यक्ष होते. पण यांपैकी नरेंद्र राणे यांनी अजित पवार यांच्या शपथविधीला हजेरी लावल्यानंत त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com