मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. त्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. गुरूवारी राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
नितेश राणे यांचा जामीन मिळणार की त्यांना अटक होणार, याचा निकाल सोमवारी लागणार आहे. उच्च न्यायालयात गुरूवारी दोन्ही बाजूचे युक्तीवाद पूर्ण झाले आहेत. त्यावर निकालासाठी न्यायालयाने 17 जानेवारी हा दिवस निश्चित केला आहे. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली आहे. केवळ राजकीय वैमनस्य ठेऊन आणि विधानसभेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना डिवचल्यानंतर माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तीवाद राणेंच्या वतीने न्यायालयात करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या (Sindhudurg DCC Bank) निवडणूक प्रचारामध्ये संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर राणे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावरील दोन्ही बाजूचे युक्तीवाद गुरूवारी पूर्ण झाले. बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी राणे यांच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला होता.
निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी हा खोटा आरोप करण्यात आला, असा युक्तिवाद ॲड. नितीन प्रधान यांनी राणे यांच्या वतीने केला होता. या प्रकरणानंतर राणे यांना धडा शिकविणार असल्याचे सेना नेते म्हटल्याचे राणेंच्या वकिलांनी सांगितले होत. 18 नोव्हेंबरला घटना घडली, 23 नोव्हेंबरला राणेंकडून Cat calling झाले आणि 24 तारखेला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले, असा घटनाक्रम वकिलांनी मांडला.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेचे प्रचारक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, अशी फौजदारी फिर्याद कणकवली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज यापूर्वी फेटाळला आहे. त्यामुळे आता त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. दरम्यान, बँकेच्या निवडणुकीत राणे गटाला बहुमत मिळाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.