नवाब मलिकांवरील कारवाईचा उद्याच होणार सोक्षमोक्ष!

नबाव मलिक (Nawab Malik) यांना सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँर्डिंग प्रकरणात अटक केली आहे.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँर्डिंग प्रकरणात अटक केली आहे. याविरोधात मलिकांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. ईडीने अटक बेकायदेशीर असून हा खटला रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मलिकांनी दाखल केली आहे. त्यावर बुधवारी (ता. 2) तातडीने सुनावणी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे आणि न्यायमूर्ती जी. ए. सानप यांच्या खंडपीठापुढे बुधवारी ही सुनावणी होणार आहे. मात्र तिथं सुनावणी न झाल्यास गुरूवारी यावर सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering) ईडीनं मलिक यांना अटक केली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयानं मलिकांना 3 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.

Nawab Malik
नवाब मलिकांना आणखी एक धक्का: मुलगा फराज मलिक यांना इडीचे समन्स

ईडीच्या (ED) कारवाईविरोधात मलिकांनी मंगळवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राजकिय हेतूने केंद्रीय तपासयंत्रणांचा गैर वापर केला जात असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. ईडीने आपल्याविरोधात दाखल केलेला खटला आणि केलेली अटक बेकायदेशीर असून, हा खटला रद्द करण्यात यावा आणि आपल्याला या आरोपांमधून ताबडतोब मुक्त करण्यात यावं, अशी मागणी मलिक यांनी याचिकेत केली आहे.

दरम्यान, मलिक यांच्या चौकशीमागे राजकीय सुडबुद्धी असल्याचा आरोपही महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. नवाब मलिक किंवा आम्ही जे सातत्याने बोलत आहेत, असत्याचा पर्दाफाश करण्यात येत आहे, मुखवटे काढले जात आहेत, त्यांच्या मागे देशभरामध्ये ईडी, सीबीआय लावले जात आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान नवाब मलिक यांच्यावरील कारवाई सुरु असतानाच आता त्यांचा मुलगा फराझ मलिक यांना देखील ईडीने समन्स पाठविले आहे. फराझ मलिक आजच ईडी कार्यालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Nawab Malik
सुपर मार्केटबाहेर रांगेत उभा असतानाच भारतीय विद्यार्थ्यावर काळ कोसळला!

नवाब मलिक यांची दाऊद इब्राहिम मनी-लाँड्रिंग प्रकरणात सध्या चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने मुंबईतील काही जमीन व्यवहारांबद्दल अंडरवर्ल्डशी संबंधित इकबाल कासकर आणि हसीना पारकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर याच प्रकरणाशी संबंधित काही लोकांची ही चौकशी करण्यात आली होती. भाजपचे नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांच्यावर याबाबत आरोप केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com